नवी मुंबई : 'एनएमएमटी'च्या एसी बसमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यावर कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडीओनंतर एनएमएमटी प्रशासनाने यासंदर्भात बसचालक व वाहकावरही कारवाई केली आहे. धावत्या बसमध्ये तरुण-तरुणीची सुरू असलेली रासलीला एका व्यक्तीने व्हिडीओ काढल्याने उघडकीस आली.
एनएमएमटीच्या पनवेल येथून कल्याणला जाणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला. बस कामोठे येथे असताना भरचौकात बसबाहेरील व्यक्तींना बसमधील जोडप्याचे अश्लील कृत्य नजरेस पडले. बसमध्ये गर्दी कमी असल्याची संधी साधून मागील बाजूस हे तरुण-तरुणी बसले होते. यावेळी त्या जोडप्याचे अश्लील कृत्य सुरू होते.
खिडकीतून बाहेरच्यांनीही पाहिली रासलीलाबसच्या खिडकीतून संपूर्ण प्रकार बाहेरील व्यक्तींना दिसत असतानाही त्यांनी हे कृत्य केले. यावरून जोडप्यांनी बसला लॉज केल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एनएमएमटी प्रशासनाने बसच्या चालक-वाहकावर कारवाई केली आहे. सदरचे घटनास्थळ कामोठेतले असल्याने त्या जोडप्याविरोधात कामोठे पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल केला आहे.