शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहाच्या डागडुजीचा खर्च अनाठायी; मंदा म्हात्रे यांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:14 IST

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाची इमारत निकृष्ट दर्जाची ठरली आहे. प्रत्येक दोन-तीन वर्षांनी डागडुजीसाठी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.

नवी मुंबई : वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाची इमारत निकृष्ट दर्जाची ठरली आहे. प्रत्येक दोन-तीन वर्षांनी डागडुजीसाठी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. हा खर्च अनाठायी असून जनतेच्या पैशांचा अपयव्य आहे. त्यामुळे नाट्यगृहाची संपूर्ण इमारत पाडून त्याठिकाणी अत्याधुनिक दर्जाची नवीन इमारत बांधावी, अशी सूचना बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिकेला केली आहे.विष्णुदास भावे नाट्यगृहाची इमारत सिडकोने बांधली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर ही इमारत हस्तांतरित करण्यात आली. सध्या महापालिका क्षेत्रात हे एकमेव नाट्यगृह आहे. असे असले तरी विविध स्तरावर हे नाट्यगृह गैरसोयीचे ठरू लागले आहे. अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. पार्किंगचा प्रश्न आहे. लिफ्टचे नियोजन नसल्याने वयोवृध्द नाट्यरसिकांना जिने चढून जावे लागत आहे. शिवाय नाट्यगृहांची आसन क्षमताही वाढविण्याची गरज आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नाट्यगृहाचा मेकओव्हर करण्याची गरज असल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे निर्मितीनंतर काही वर्षातच ही इमारत निकृष्ट ठरली आहे. त्यामुळे प्रत्येक दोन- तीन वर्षांनी नाट्यगृहाच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. आता पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल १३ कोटी रुपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला आहे. डागडुजीच्या नावाने सुरू असलेली पैशांची ही उधळपट्टी थांबविण्याची गरज असल्याचे त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह उपयुक्त ठरत आहे. मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शहरवासीयांची संपूर्ण मदार भावे नाट्यगृहावर आहे. त्यामुळे महापालिकेने इमारतीच्या डागडुजीवर अधिक पैसा खर्च न करता संपूर्ण इमारतच नव्याने उभारावी. यात प्रदर्शन हॉल, थिएटर, फूडप्लाझा, स्टील्ट पार्किंग आदी सुविधा उपलब्ध कराव्यात. नाट्यगृहाची सध्याची आसन क्षमता वाढवून ती दोन हजार प्रेक्षकापर्यंत करावी, आदी सूचना मंदा म्हात्रे यांनी केल्या आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई