शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात नगरसेवकाची ‘दंडुके’शाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:54 IST

वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम लागत नसल्याने नगरसेवकानेच दंडुकेशाही वापरल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ऐरोलीत घडला.

नवी मुंबई : वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम लागत नसल्याने नगरसेवकानेच दंडुकेशाही वापरल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ऐरोलीत घडला. या प्रकारात नगरसेवकाने बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या असलेल्या १० ते १२ रिक्षांच्या काचा फोडून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रिक्षाचालकांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.ऐरोली रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूस रिक्षांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. रिक्षा परमिट खुले केल्यापासून शहरातील रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे भाडे मिळवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागलेली असते. त्याकरिता अनेक ठिकाणी अवैध थांबे तयार करण्यात आले आहेत. शिवाय जागा मिळेल तिथे रस्त्यावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. असाच प्रकार ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेरही पाहायला मिळत आहे.यासंदर्भात नगरसेवक मनोज हळदणकर यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. यानुसार तिथल्या रिक्षांना शिस्त लावावी, अशी मागणी त्यांनी वाहतूक पोलिसांकडे केली होती. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी असलेल्या एका रिक्षा संघटनेचेही ते उपाध्यक्ष आहेत. परंतु वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने व रिक्षाचालकांना शिस्त लागत नसल्याने सोमवारी सकाळी त्यांनी कायदा हातात घेतला.सकाळी ८ च्या सुमारास त्यांनी हातात दंडुका घेऊन बेशिस्तपणे उभ्या असणाऱ्या १० ते १२ रिक्षांच्या काचा फोडून त्यांना तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर परिसरात रिक्षाचालकांनी जमून संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. अखेर रिक्षाचालकांनी घडलेल्या प्रकाराची रबाळे पोलिसांकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा उभ्या केल्या जातात. यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. परंतु पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नाईलाजास्तव कायदा हातात घ्यावा लागला.- मनोज हळदणकर,नगरसेवक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई