नवी मुंबई : अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज कार्यरत राहून अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांना आकार देताना वैविध्यपूर्ण सक्षमतेचे दर्शन घडवते, असे चित्र सिडको महामंडळातच प्रथम पहावला मिळाले. आंतरराष्ट्रीय विमानतळ ते स्मार्ट सिटी प्रकल्पांपर्यंत सर्व प्रकल्पांत आपले कौशल्य प्रदर्शित केले, याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी काढले.सिडकोतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन गेल्या आठवड्यात पार पडले. त्याप्रसंगी भाटिया बोलत होते. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा, अभिनेता वैभव मांगले, तसेच सिडकोचे वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते. त्याप्रसंगी भाटिया बोलत होते. महामंडळाचे नाव उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण योगदान देणारे हे माझे कुटुंबस्रेही कोणत्याही बाबीत कमी पडत नाहीत, किंबहुना नवनवीन आव्हाने पेलण्यास सज्ज असल्याचे भाटिया यांनी सांगितले.सिडको परिवारात सामील झाल्यापासून मला खूप चांगले अनुभव संग्रहित करता आले. या संस्थेतील माझ्या सहकाऱ्यांनी आमच्या सर्व संकल्पनांना मूर्त आकार देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि माझ्या प्रशासकीय सेवेतील मागील तीन वर्षांच्या कारकिर्दीला अनोखे रूप आणून दिल्याचे व्ही. राधा आपल्या भाषणात म्हणाल्या. तर प्रत्येकाने आपले कलागुण जोपासताना त्यात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक माणसात काहीतरी कलागुण असतातच त्याची जोपासना केली पाहिजे, असे मत अभिनेता वैभव मांगले याने मांडले. सिडको स्रेहसंमेलन २०१६ च्या निमित्ताने सिडको अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता विविध कला-क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्रेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रशांत दामले फॅन फाउंडेशन निर्मित प्रशांत दामले, तेजश्री प्रधान, अभिनित ‘कार्टी काळजात घुसली’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या स्रेहसंमेलनाचे आयोजन सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी केले.(प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांचे कार्यगुण जोपासणारे महामंडळ
By admin | Updated: March 9, 2016 03:46 IST