शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

महानगरपालिकेने घेतली खासगी शाळांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:34 IST

पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन : सूचनांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाऊन कालावधीत शाळांनी फी न भरल्यामुळे आॅनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांना कमी करणे, फी भरण्यासाठी सक्ती करणे, विद्यार्थ्यांचे निकाल न देणे अशा विविध तक्रारी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे येत आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून सोमवारी २१ सप्टेंबर रोजी शहरातील खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याध्यापकांना करण्यात आले, तसेच सूचनांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांचे आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊन कालावधीत फीबाबतच्या विविध तक्रारी सद्यस्थितीत शिक्षण विभागाकडे येत असल्याबाबत महापालिकेचे संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी शाळांतील मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. आॅनलाइन शिक्षणापासुन कोणत्याही विद्यार्थ्यांना वंचित ठेवता येणार नाही. फी भरण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांना फी भरण्यास सक्ती करू नये, अथवा फी भरण्याबाबत शाळेने टप्पे करून द्यावेत, असे अतिरिक्त आयुक्तांनी सुचविले आहे.

तसेच प्रत्येक शाळेने आपल्या शाळेत तक्रार पेटी व सुचना पेटी शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी. प्रत्येक शाळेने कोणती फी आकारण्यात येते त्याबाबतचा फलक दर्शनीभागात लावण्यात यावा. शाळेबाबत वारंवार फी बाबत प्राप्त होणाºया तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने एक समिती करण्यात यावी व या समिती मार्फत ज्या शाळेची तक्रार प्राप्त होईल त्या शाळेत प्रत्यक्ष जाऊन सदर समिती तक्रारीबाबत चौकशी करेल असे निर्देश काकडे यांनी दिले.

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने पालकांच्या तक्रारीची दखल घेण्याबाबत विभागात तक्रार पेटी व सूचनापेटी तयार करण्यात आली आहे, तसेच शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींसाठी पालक, नागरिक ०२२- २७५७७०६७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

टॅग्स :Schoolशाळा