शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : पोलिसांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; वयस्कर व आजारी कर्मचाऱ्यांना बंदोबस्त नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 20:55 IST

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागला आहे. तर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा देखील संपेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरील ताण अधिकच वाढू शकतो.

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे मागील दीड महिना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्याशिवाय त्यांच्याही कुटुंबीयांना अन्न धान्याची चणचण भासणार नाही याचीही खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान ५० वर्षे वयाच्या व प्रकृती ठिक नसलेल्यांना देखील तणावापासून लांब ठेवले जात आहे. 

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागला आहे. तर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा देखील संपेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरील ताण अधिकच वाढू शकतो. अशावेळी त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य ठिक राहावे, यासाठी पोलीस आयुक्तालय मार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याकरिता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घरची चिंता लागू नये याकरिता ४ हजार कर्मचाऱ्यांना अन्न धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय बंदोबस्ताचा ठिकाणी सावलीसाठी शेड व सॅनिटायझर पुरविले आहेत. सध्या आयुक्तालय क्षेत्रात ९ चेकपोस्ट लावण्यात आल्या असून त्या सर्व ठिकाणी मंडप घातले आहेत. त्याठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना अन्न पाण्याचीही सोय केली आहे.

पोलीस संजय कुमार, सह आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्यासह सर्व उपायुक्तांकडून कोरोनापासून पोलिसांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. बॅचरल राहणाऱ्या ४५० कर्मचाऱ्यांची दोन वेळच जेवण दिले जात आहे.  तर वयाने ५० वर्षापेक्षा जास्त असलेल्यांना व प्रकृतीची कारणे असलेल्यांना तणावाच्या ठिकाणच्या बंदोबस्तामधून वगळण्यात आले आहे. शिवाय कर्तव्य बजावत असताना सुरक्षेसाठी ६२६४ हॅन्डग्लोज, २५०० हेडशिल्ड व ६०० गॉगल पुरवण्यात आलेत. प्रत्येक पोलिसठाण्यात पाच पीपीई किट देण्यात आले आहेत. शिवाय ४९०० अधिकारी व कर्मचारी यांना एन ९५ मास्कचे व कुटुंबियांना तीन लेयरच्या सुमारे ३८ हजार मास्कचे वाटप केले आहे. 

आरोग्याच्या दृष्टीने सर्वांची वैद्यकीय चाचणी केली असता डॉक्टरांनी ७४ जनाची कोरोना चाचणी करण्याचे सुचवले होते. त्यापैकी ३२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४२ जणांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. दरम्यान पोलिसांचे स्वास्थ्य ठीक राहावे यासाठी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधें देण्यात आली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई