शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus रायगडच्या संशयितांची परवड; 11.30 वाजले तरीही चहा, नाश्ता दिला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 12:50 IST

बैठकांनंतर पनवेल महापालिका प्रशासन आणि राज्याचे आरोग्य खाते यांनी खारघरच्या ग्रामविकास भवनात 14 दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पनवेल : रायगड, पनवेल परिसरातील दुबईहून परतलेल्या 35 जणांना ग्रामविकास भवनात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णांची राज्य शासन आणि पालिका प्रशासनाच्या विसंगतीमुळे परवड होत असून रात्री 11 वाजता दिलेल्या जेवणानंतर सकाळी 11.30 वाजेपर्यंत नाश्ता देण्यात आला नव्हता. या नागरिकांनी ओरड मारल्यानंतर त्यांना चहा आणि बिस्किटे देण्यात आली. महत्वाचे म्हणजे या नागरिकांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले खोपोलीचे वृद्ध दांम्पत्यही आहे.

रविवारी सकाळी दुबईवरून दोन विमाने मुंबईत दाखल झाली होती. यामध्ये दुबईतील शारजाहमध्ये खेळायला गेलेले क्रिकेटपटू आणि नागरिकही होते. त्यांना रायगडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, पहिल्या 16 जणांपैकी फक्त तीन जणांनाच संशयित म्हणून थांबवून घेत इतरांना सोडून देण्यात आले होते. यामुळे या तिघांनीही ठेवायचे तर सर्वांना ठेवा, आम्हालाच कशाला, असे म्हणत घरी जाणे पसंद केले होते. यामुळे आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली होती. अखेर आरोग्य विभागाने त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले होते. 

बैठकांनंतर पनवेल महापालिका प्रशासन आणि राज्याचे आरोग्य खाते यांनी खारघरच्या ग्रामविकास भवनात 14 दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर या सर्व 35 जणांना खारघरमध्ये हलविण्यात आले. रात्री या संशयितांना डाळ खिचडी अॅल्यूमिनिअमच्या पिशवीतून देण्यात आली होती. यासोबत चमचा किंवा प्लेट देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे यातील काहींनी बाहेरून जेवणाची व्यवस्था केली. या ग्रामविकास भवनामध्ये बाथरूममध्ये पाण्याचीही सोय केलेली नसल्याचा आरोप यातील संशयित नागरिकांनी केला आहे. तसेच या संशयितांमध्ये 8 दिवसांपूर्वी  दुबईहून भारतात आलेल्या तरुणालाही रविवारी घरातून विलगीकरण केंद्रात आणण्यात आले आहे. 

उशिराने आलेला नाष्टा दरवाजातून परत पाठवलाखारघरच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवलेल्या संशयितांना आज सकाळी 11 वाजले तरीही चहा, नाश्ता देण्यात आला नव्हता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. अखेर 11.30 च्या सुमारास पोलिसांनी त्यांना बिस्किटे आणि चहा दिला. हा नाष्टा संशयितांनी परत पाठविला. तर वृद्ध दांम्पत्याला बाहेरून जेवण देण्याची सोय करण्यास त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. 

यावर महापालिका प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला असून सर्वांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता कंत्राटदार नेमला असल्याचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

कोरोनाला रोखण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन लागले कामाला

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाpanvelपनवेलRaigadरायगड