शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CoronaVirus News: रुग्णांना परत मिळाले एक कोटी; अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या रुग्णालयांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 00:34 IST

CoronaVirus Navi Mumbai News: बिले तपासणारी नवी मुंबई एकमेव महापालिका

नवी मुंबई : रुग्णांची लुबाडणूक करणाºया रुग्णालय व्यवस्थापनांना महानगरपालिकेने दणका दिला आहे. आतार्यंत १ कोटी ३६ लाख रुपये नागरिकांना परत मिळवून दिले आहेत. तक्रारी न आलेली बिलेही तपासण्यात आली असून, सर्व बिले तपासणारी नवी मुंबई एकमेव महानगरपालिका ठरली आहे.कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने बिलांची आकारणी केली जाऊ लागली होती. रुग्णालयांकडून होणाºया लुबाडणुकीविषयी अनेकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. मनसे व इतर पक्षांनीही याविषयी आवाज उठविला होता. या प्रकाराची दखल आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेऊन, खासगी रुग्णालयांनी शासनाच्या नियमावलीप्रमाणेच बिलांची आकारणी करावी, असे आदेश सर्व व्यवस्थापनांना दिले होते. लुबाडणूक थांबविण्यासाठी तक्रार निवारण केंद्र सुरू केले. बिलांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. महानगरपालिकेकडे आलेल्या तक्रारीची २४ तासांत दखल घेण्यास सुरुवात झाली. याशिवाय आयुक्तांनी मार्चपासूनची सर्व बिले तपासण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तक्रारी न आलेली बिलेही तपासण्यास सुरुवात झाली व रुग्णांकडून अतिरिक्त घेतलेले शुल्क परत करण्यास सुरुवात झाली.महानगरपालिकेने १३ सप्टेंबरपर्यंत ३२ लाख ३२२ रुपये नागरिकांना परत मिळवून दिले होते. त्यानंतरच्या काळात कोरोना तक्रार निवारण केंद्रातील हेल्पलाइन नंबर व व्हॉट्सअप अ‍ॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारींची छाननी करून १२ रुग्णालयांना ४१ लाख ३८ हजार ७९७ रुपये परत करण्यास लावले. महानगरपालिकेने सर्व रुग्णालयांमधील मार्चपासूनची बिले तपासण्यासाठी ६ विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी ८१२ पैकी आतापर्यंत ६६२ देयकांची तपासणी केली. रुग्णांकडून ६२ लाख ८८ हजार ८२३ रुपये अतिरिक्त स्वीकारल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित पाच रुग्णालयांना सदर रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोना रुग्णांवरील उपचार पद्धती व आकारल्या जाणाºया देयक रकमांवर नियंत्रण ठेवण्याविषयी निर्देश प्रशासनास दिले आहेत. २१ मे व ३१ आॅगस्टला शासनाने अधिसूचना काढून खासगी रुग्णालयांनी उपचार करताना किती बिल आकारावे, याविषयी दर निश्चित करून दिले आहेत. या आदेशाचे पालन करण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.‘लोकमत’चे यशखासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुबाडणूक होत असल्याचे ‘लोेकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. ४ सप्टेंबरला रिअ‍ॅलिटी चेकच्या माध्यमातून शहरातील रुग्णालयांमधील सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर, सातत्याने या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. याची दखल घेऊन प्रशासनाने लुबाडणूक थांबविण्यासाठी तक्रार निवारण समिती व लेखा परीक्षण सुरू केले होते.महापालिका तक्रार निवारण कक्षमहानगरपालिकेने बिलांविषयी असणाºया तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष तयार केला आहे. २७५६७३८९ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करता येते. याशिवाय ७२०८४९००१० हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी काही तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय स्वतंत्र विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व बिलांची पडताळणी केली जात असून, अशा प्रकारे सर्व बिले तपासणारी नवी मुंबई एकमेव महानगरपालिका आहे.शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाप्रमाणेच बिलांची आकारणी करणे बंधनकारक आहे. पडताळणीदरम्यान विसंगती केल्याचे आढळून आल्यास व त्यामधून रुग्णाची आर्थिक पिळवणूक होत असल्यास, अशा रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियमान्वये आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलमान्वये आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- अभिजीत बांगर, आयुक्त, मनपारुग्णालयनिहाय परतावा रक्कमरूग्णालय परतावातेरणा हॉस्पिटल नेरुळ १९ लाख ६४ हजारडॉ. डी.वाय. पाटील नेरुळ ६ लाख ३६ हजारपी. के. सी. रुग्णालय वाशी ३ लाख ४२ हजारफोर्टीज हॉस्पिटल वाशी २ लाख ५० हजारअपोलो हॉस्पिटल बेलापूर २ लाख २७ हजाररिलायन्स कोपरखैरणे १ लाख ४२ हजारन्युरोजन सीवूड १ लाख ३७ हजार ४२९फ्रीझॉन घणसोली १ लाख २६ हजारग्लोबल हेल्थ केअर वाशी १ लाख १५ हजार २०२सिद्धिका कोपरखैरणे १ लाख १४ हजारएमजीएम सीबीडी ५६ हजार १६१इंद्रावती ऐरोली २९ हजारमनपाने स्वत: दिलेला परतावारुग्णालय परतावाफोर्टिज वाशी १७ लाख ८६ हजार ४२५फ्रिझॉन घणसोली १४ लाख ४१ हजार ३३५सनशाइन नेरुळ १२ लाख ३२ हजार २७२एमजीएम वाशी ७ लाख ३७ हजार ८५१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका