शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

CoronaVirus News in Navi Mumbai : झोपडपट्टीत कोरोनाचा हाहाकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:26 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. सर्वात गंभीर परिस्थिती तुर्भे स्टोअरमध्ये झाली असून ३५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : येथील झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेरूळ, तुर्भे ते दिघापर्यंत पसरलेला झोपडपट्टी परिसर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे.झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. सर्वात गंभीर परिस्थिती तुर्भे स्टोअरमध्ये झाली असून ३५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जवळपास तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगार व इतरांना लागण झाली असून त्यांच्यामुळे सर्व वसाहतीमध्ये रुग्ण वाढत आहेत. इंदिरा नगर झोपडपट्टीमधील औषध कंपनीत काम करणारे मजूर व येथील औषध दुकानदारांनाही कोरोनाची लागण झाली. यानंतर झोपडपट्टीतील इतरांनाही लागण झाली आहे. याचप्रमाणे नेरुळ मधील शिवाजीनगर, तुर्भे परिसरातील हनुमान नगर, दिघा विभागातील बिंदू माधव नगर, कन्हैयानगर, गांधीनगर, ईश्वरनगर, साठेनगर येथेही रुग्ण सापडले आहेत. झोपडपट्टी परिसरात सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन होत नाही व करताही येत नाही. तीव्र उकाड्यामुळे नागरिक घराबाहेर थांबत आहेत. छोट्या घरामध्ये पाच ते दहा नागरिक वास्तव्य करत आहेत. काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.झोपडपट्टी परिसरात महानगरपालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. जनजागृती नियमित सुरू आहे. औषध फवारणी ही केली जात आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे; परंतु काही ठिकाणी औषध फवारणी योग्य प्रकारे होत नाही. रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन केले जात नाही, अशाप्रकारच्या तक्रारी वाढत आहेत. झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक प्रसाधनगृहाचा वापर केला जातो. यामुळे प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. सद्य:स्थितीमध्ये एलआयजी वसाहतीपेक्षा झोपडपट्टी परिसरात कमी रुग्ण आहेत; परंतु ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर धारावी प्रमाणे नवी मुंबईमधील झोपडपट्टीतही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका प्रशासनाने झोपडपट्टी परिसरासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणी होत आहे.एलआयजी वसाहतींची स्थिती बिकटनवी मुंबईमधील झोपडपट्टीपेक्षा एलआयजी वसाहतीची स्थिती गंभीर झाली आहे. कोपरखैरणे, तुर्भे परिसरात माथाडी वसाहत व अल्पउत्पन्न गटातील वसाहत असलेल्या परिसरात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढत आहेत. या वसाहती असलेल्या कोपरखैरणे व तुर्भे नोडमध्ये नवी मुंबईमधील सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूतुर्भे स्टोअर, तुर्भे नाका, हनुमान नगर, इंदिरा नगर, शिवाजी नगर, बिंदू माधव नगर, साठे नगर, ईश्वर नगर,गांधी नगर, कन्हैया नगर.तुर्भे स्टोअर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. औषध फवारणी, जनजागृती व इतर अनेक उपाय केले जात आहेत.सुरेश कुलकर्णी,माजी स्थायी समिती सभापतीमहानगरपालिकेने रुग्ण सापडलेल्या परिसरात तत्काळ औषध फवारणी केली पाहिजे. झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.अन्वर शेख,माजी परिवहन सभापतीझोपडपट्टी परिसरासाठी महानगरपालिकेने विशेष धोरण राबविले पाहिजे. मैदान व मोकळ्या भूखंडावर स्वतंत्र क्वारंटाइन सेंटर सुरू केले पाहिजे. औषध फवारणी व इतर उपाययोजना ही प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.-अमित मेढकरमाजी नगरसेवक, हनुमान नगरझोपडपट्टी परिसरात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना राबवाव्यात. सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठीही उपाययोजना करणे आवश्यक आहे.- महेश कोठीवाले, शिवसेना विभागप्रमुख

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस