शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

CoronaVirus News: बिनधास्त वावरल्याने 43.39 लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:02 AM

नवी मुंबईत मास्क न घातलेल्यांची संख्या सर्वाधिक; नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी न घेणाऱ्या १७ हजार ९२९ जणांवर तीन महिन्यांत कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ४३ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात विनामास्क वावरणाऱ्या व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. यानंतरही पुरेशी खबरदारी न घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दंडही आकारला जात आहे. त्यानुसार, चालू वर्षात तीन महिन्यांत तब्बल १७ हजार ९२९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामधील काही कारवाया नवी मुंबई महापालिका व स्थानिक पोलीस यांनी संयुक्तरीत्या केल्या आहेत. त्यानुसार, कारवाई झालेल्या व्यक्तींकडून ४३ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात विनामास्क वावरणाऱ्या व्यक्ती आघाडीवर आहेत. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी मास्क वापरण्याच्या सूचना केल्या जात आहेत. यानंतरही मास्क न वापरता अनेक जण गर्दीच्या ठिकाणी फिरत असतात, तर काही जण केवळ दिखाव्यासाठी हनुवटीला मास्क अडकवून फिरत असतात. अशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशा प्रकारे विनामास्क वावरणाऱ्या ४ हजार ६३५ जणांकडून तीन महिन्यांत १७ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर योग्य खबरदारी न घेता आस्थापना चालवणाऱ्या ११५ व्यावसायिकांवर कारवाई करून ७ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा दंड शासन तिजोरीत जमा करण्यात आला आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जावे, यासाठी पोलीस व महापालिका यांच्याकडून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून गर्दीच्या ठिकाणी अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी पाळत ठेवून या कारवाया केल्या जात आहेत. यानंतरही अनेक ठिकाणी पुरेशी खबरदारी न घेता, नागरिक वावरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास हातभार लागत आहे. परिणामी, शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन गरजेचे आहे. यानंतरही अनेक जण विमा मास्क वावरत असून, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. अशा १७ हजार ९२९ जणांवर तीन महिन्यांत कारवाई करून ४३ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. - सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या