शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

CoronaVirus News : कोरोनाचा पोलीस ठाण्यात शिरकाव, अधिकाऱ्यांसह कर्मचारीही बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:05 IST

नवी मुंबईत कोरोना पसरू लागताच, पोलिसांकडून बंदोबस्त दरम्यान विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोनाने अखेर पोलीस ठाण्यातही शिरकाव केला आहे. नवी मुंबई पोलीस दलातील १७० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यापैकी १२० जणांची उपचारानंतर प्रकृती ठणठणीत झाली आहे. सुदैवाने यामध्ये एकानेही प्राण गमावले नाहीत.नवी मुंबईत कोरोना पसरू लागताच, पोलिसांकडून बंदोबस्त दरम्यान विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती. त्याकरिता बंदोबस्तावरील पोलिसांना सॅनिटाइज करण्याचे वाहन तयार करण्यापासून ते पोलीस ठाण्याच्या प्रवेशावरही सॅनिटाइज होण्याची साधने पुरविण्यात आली होती. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त किरकोळ तक्रारींसाठी नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली होती.त्यानंतरही सुरुवातीचा एक महिना सुरक्षित काढल्यानंतर, मागील दोन महिन्यांपासून पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली. पाहता-पाहता पोलीस ठाण्यापर्यंतही कोरोनाचा संसर्ग पोहोचल्याने प्रत्यक्षात कामकाजावरही परिणाम दिसून येऊ लागला आहे. मागील दोन महिन्यांत बंदोबस्तावेळी अथवा नकळत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने, पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामळे परिमंडळ एक व दोनमध्ये अद्यापपर्यंत १७० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचारासाठी कळंबोली व नेरुळ येथे विशेष कॉरंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहेत, तर प्रकृती गंभीर असल्यास उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात सोय करून ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर १२० पोलीस ठणठणीत झाले आहेत, तर ५० जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.>कामकाजावर परिणाममागील काही दिवसांत वरिष्ठ निरीक्षकासह दुय्यम दर्जाचे पोलीस निरीक्षकही कोरोनाच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. तर उपायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कॉरंटाईन व्हावे लागले होते.पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकारी व कर्मचारी यांनाही कॉरंटाइन व्हावे लागत आहे.याचा परिणाम अनेक पोलीस ठाण्यातल्या कामकाजावर जाणवत आहे.