शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

CoronaVirus News: वाढत्या रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 01:05 IST

रुग्णसंख्या सात हजारपेक्षा जास्त; रुग्णालयांत ४१८८ खाटांची क्षमता

नवी मुंबई : शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून, प्रतिदिन ७०० ते ९०० रुग्ण वाढत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारपेक्षा जास्त झाली असून, मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ४१८८ रुग्णखाटा उपलब्ध आहेत. जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये आयसीयू युनिट फुल्ल झाले आहेत. मनपाकडे आयसीयूची कमतरता असल्यामुळे पूर्णपणे खासगी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागत आहे.              राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. वेगाने रुग्ण वाढत असून, त्यांना उपचार मिळवून देण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जनरल व ऑक्सिजन रुग्ण खाटांची सुविधा आहे. परंतु आयसीयू व व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाबरोबर मनपाने करार केला आहे. परंतु तेथील व्यवस्थाही कमी पडू लागली आहे. यामुळे आयसीयूसाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागत आहे. डॉक्टर्सची कमतरतामहानगरपालिका प्रशासनाने डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचारी यांची भरती सुरू केली आहे. परंतु मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. यामुळे नवीन आयसीयू युनिट व नवीन उपचार केंद्र सुरू करता येत नाहीत. खासगी रुग्णालयांमध्येही मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. यामुळे भविष्यात वाढणाऱ्या रुग्णांना उपचार मिळवून देताना कसरत करावी लागणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्ण खाटांच्या उपलब्धतेविषयी दिलेली आकडेवारी व प्रत्यक्षात वस्तुस्थिती यामध्ये खूप फरक आहे. रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड उपलब्ध होत नाहीत. आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिटमध्ये जागा मिळवून देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. - राजू शिंदे, माजी आरोग्य सभापती महानगरपालिका हेल्पलाइन सुरू करणारवाढणाऱ्या रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेने हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  हेल्पलाईनवर चोवीस तास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. रुग्णांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना शहरातील कोणत्या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत, याविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.आयुक्त अभिजित बांगर यांनी शनिवारी शहरातील खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनांशी चर्चा करून युद्धपातळीवर आयसीयू युनिट वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर शहरात किती रुग्णखाटांची सुविधा आहे, कोणत्या रुग्णालयात किती रुग्णखाटा शिल्लक  आहेत, याची माहिती दिली आहे. परंतु संबंधित रुग्णालयांशी संपर्क केल्यानंतर प्रत्यक्षात जागा नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयांमध्ये जागा मिळवून देण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. राजकीय प्रतिनिधींनाही रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या