शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोविड योद्ध्याची मृत्यूनंतरही उपेक्षा; डॉक्टरसह पत्नीचा मृतदेह चार दिवस शवागृहातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 07:40 IST

कोरोना अहवाल मिळण्यास विलंब

नामदेव मोरे 

नवी मुंबई : सीवूड सेक्टर ४८ मध्ये राहणाऱ्या डॉक्टरचा रविवारी मृत्यू झाला. दुसºया दिवशी त्यांच्या पत्नीचेही मनपा रुग्णालयात निधन झाले. या दोघांचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने त्यांचे मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले आहेत. मुलासहीरुग्णालयात दाखल केले आहे. कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टर व त्याच्या कुटुंबीयांच्या शोकांतिकेविषयी परिसरात हळहळव्यक्त केली जात असून प्रशासकीय उदासीनतेविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

सीवूडमध्ये राहणारे डॉक्टर गोवंडीमध्ये दवाखाना चालवितात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी दवाखाना बंदकेला होता. परंतु मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सूचनेवरून ते पुन्हा सेवेत दाखल झाल्याची माहिती डॉक्टर राहत असलेल्या सोसायटीमधून मिळाली. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी स्वत:च स्वत:वर उपचार सुरू केले होते. रविवारी ३ मे रोजी सकाळी त्यांचेघरामध्येच निधन झाले. पत्नी व १७ वर्षाच्या मुलाने सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर तात्काळ खाजगी व मनपा रूग्णालयातफोन करून रूग्णवाहीका मागविली. परंतु दोन तास रूग्णवाहिका आलीच नाही. दुपारी १२ ते १ दरम्यान रूग्णवाहिकेमधून डॉक्टरांनारूग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबियांना पोलीस स्टेशनची व इतर कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.

डॉक्टरची पत्नी व लहान मुलगा सायंकाळपर्यंत धावपळ करत होता. सायंकाळी त्यांच्या पत्नीला अस्वस्थ वाटू लागल्याने खाजगी व मनपारूग्णालयातून रूग्णवाहीका बोलावली. नेरूळ व वाशीतील खासगी रूग्णालयात त्यांना घेण्यात आले नाही. शेवटी रात्री त्यांना मनपारूग्णालयात दाखल केले. मुलास दाखल करून न घेता घरी पाठविले. सोमवारी पहाटे डॉक्टरच्या पत्नीचाही मृत्यू झाला. रविवारी डॉक्टरचा व सोमवारी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर पालिकेने मुलासही रूग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी दुपारपर्यंत दोघांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले नव्हते. संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अहवाल चोवीस तासात मिळणे अपेक्षित आहे.परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे ते मिळू शकले नाहीत. डॉक्टर रहात असलेल्या सोसायटी मधील ८ इमारतीमध्ये एकूण १२८ फ्लॅट असूनजवळपास ५०० नागरिक राहतात. चार दिवस येथील पदाधिकारी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु योग्य प्रतिसाद मिळत नाही. एका कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांची होणारी अवहेलना पाहून रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहेनवी मुंबईमध्ये लॅबचा प्रस्तावशहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत नवी मुंबईमधील अहवाल जेजे रुग्णालयातील लॅबमध्ये पाठविले जात असून रिपोर्ट मिळण्यास तीन ते पाच दिवसांचा कालावधी जात आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता नवी मुंबईमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस