शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
4
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
5
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
6
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
7
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
8
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
9
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
10
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
11
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
13
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
14
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
15
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
16
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
18
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
19
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
20
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात

CoronaVirus Lockdown News: सलग दुसऱ्या दिवशीही व्यापारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:37 IST

खारघरमध्ये काळे कपडे परिधान करून तयार केली मानवी साखळी

पनवेल : शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने व्यापारी दुकानदाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे बुधवारी खारघरमधील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या विरोधात उत्सव चौकात मानवी साखळी तयार करून काळे कपडे परिधान करून लॉकडाऊनचा निषेध केला. उत्सव चौक येथील बँक ऑफ इंडिया सिग्नलजवळ शहरातील ज्वेलर्स, फर्निचर दुकान, कपडे विक्रेते, लहान फेरीवाले, खेळण्यांचे दुकानदार आदींसह मोठ्या संख्येने दुकानदार सकाळी ९ वाजता जमून दोन तास निदर्शने केली. यावेळी व्यापारी ‘जिने दो जिने दो व्यापरीयो को जिने दो’ अशा स्वरूपाच्या घोषणा देत होते. तसेच हातात ‘कोरोना पहिले खत्म होगा या व्यापारी’ अशा स्वरूपाचे बॅनर झळकवले होते.शहरातील एकता व्यापारी असोसिएशनच्या वतीने ही निदर्शन करण्यात आली. यावेळी एकता व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र लिहून सर्व व्यापाऱ्यांना पालिका प्रशासनाने कांदे-बटाटे विकण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून बंद असलेल्या दुकानातून काही तरी उपजीविकेचे साधन निर्माण होईल. शासनाने निर्बंध शिथिल न केल्यास आम्हाला रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येईल असे सांगितले. नवी मुंबईत निदर्शने केल्याप्रकरणी गुन्हे दाखलनवी मुंबई : राज्य शासनाने लागू केलेल्या कठोर निर्बंधांना व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहेत. नियम डावलून हे आंदोलन होत असल्याने वाशी व एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबईत मंगळवारपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात केवळ अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले आहे. यामुळे इतर व्यापाऱ्यांना आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना महापालिका व पोलीस प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र बहुतेक व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध दर्शवला आहे. त्यानुसार शासन आदेशाच्या विरोधात ठिकठिकाणी जमाव जमवून निदर्शने केली जात आहेत. त्यानुसार मंगळवारी दुपारी सीवूड सेक्टर ४० परिसरात २५ ते ३० व्यापारी रस्त्यावर जमले होते, तर बुधवारी सकाळी वाशी व कोपर खैरणे येथे व्यापाऱ्यांनी साखळी आंदोलन करून राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. मात्र राज्यात जमावबंदी व संचारबंदी असतानाही नियम डावलून निदर्शने केल्याप्रकरणी एनआरआय व वाशी पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या