शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus, Lockdown News: कोरोनाचा विळखा: एपीएमसीतील आवक सलग तिसऱ्या दिवशीही घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 00:53 IST

बाजार समितीत आतापर्यंत ३३ जणांना लागण; व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला असून तीन दिवसांपासून आवक सातत्याने घटली आहे. व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून अनेकांनी घरी थांबणे पसंत केले आहे.

बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये आतापर्यंत ३३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. मार्केटच्या गेटबाहेर किरकोळ विक्रेते व रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे २५ जणांना प्रादुर्भाव झाला असून एपीएमसी संबंधित रुग्णांची संख्या ५८ झाली आहे. यामध्ये व्यापारी, माथाडी कामगार, सुरक्षारक्षक, कँटीनमधील कामगार व व्यापाºयांच्या कार्यालयात काम करणाºयांचाही समावेश आहे.

मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रुग्ण वाढू लागल्यानंतर ही सर्व मार्केट बंद ठेवण्याऐवजी रुग्ण सापडलेली विंग सील केली जात आहे. रुग्णांच्या परिवारातील सदस्यांनाही लागण झाली आहे. फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाºयास लागण झाल्यानंतर अनेक सुरक्षा कर्मचाºयांनी सुट्टी घेतली आहे. व्यापारी व कामगारांनीही सुट्टी घेण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी केवळ ११३ गाड्या आल्या आहेत. तर चार मार्केटमध्ये मिळून फक्त ५७० वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली असून ५० टक्के आवक घटली आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही दिवसांत पुन्हा जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजीपाला व्यापाऱ्यांचे आवाहनभाजीपाला मार्केटमध्ये रुग्ण वाढू लागल्यानंतर व्यापाºयांनी सोशल मीडियावरून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या गाळ्यांतरुग्ण सापडले आहेत तेथील व्यापार थांबविला आहे. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनीही मार्केटमध्ये येणेथांबवावे. स्वत: ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या