शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : इराणचे मालवाहू जहाज दहा दिवसांपासून समुद्रात उभे, जेएनपीटीत रेड सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:45 IST

देशभरातील बंदरे ही कोरोनाच्या दहशतीत सापडली आहेत. याला देशातील नंबर एकचे जेएनपीटी बंदरही अपवाद नाही. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

उरण : इराणहून अमोनिया रसायनाने भरलेल्या जहाजाला जेएनपीटीने बंदरात येण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे दहा-बारा दिवसांपासून समुद्रात नांगरून ठेवण्यात आल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.देशभरातील बंदरे ही कोरोनाच्या दहशतीत सापडली आहेत. याला देशातील नंबर एकचे जेएनपीटी बंदरही अपवाद नाही. या बंदरात जगभरातून मालवाहू जहाजे येतात. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची दखल घेऊन चीनमधून येणाºया जहाजांना जेएनपीटीने अनेक निर्बंध घातले आहेत. जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरच्या (पीएचओ) परवानगीनंतरच जहाजांना बंदरात येण्याची परवानगी दिली जाते. मात्र जहाजावरील एकाही कर्मचाºयाला बंदरात उतरू दिले जात नाही. दिवसात किती जहाजे आली, किती रवाना झाली आणि जहाजांवरील किती कर्मचाऱ्यांची तपासणी केली, त्याचा संपूर्ण तपशीलही केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येतो, अशी माहिती जेएनपीटीच्या अधिकाºयांनी दिली.कोरोनाबाधित देशांचा तपशील जेएनपीटी प्रशासनाकडे उपलब्ध आहे. अशा कोरोनाबाधित देशातून येणाºया जहाजांना १५ दिवस बंदरात येण्यास परवानगी दिली जात नाही. इराणच्या जहाजावर तुर्की, भारतीय १५ दिवसांनंतर जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरच्या परवानगीनंतरच हे जहाज बंदरात लॅण्डिंग करू शकेल, अशी माहिती जेएनपीटीचे कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी दिली. बंदरात मालवाहू जहाजे शेड्युलप्रमाणेच दाखल होत आहेत. त्यामुळे आयात-निर्यात व्यापारात फारसा परिणाम झाला नसल्याचेही कपूर यांनी सांगितले.कोरोनामुळे बंदरात येणाºया मालवाहू जहाजांची संख्या कमी झाली आहे. पाच कंपन्यांच्या जहाजांनी शेड्युल ब्रेक केले असल्याची माहिती जेएनपीटीच्या संबंधित अधिकाºयांनी दिली. तर भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदरावर कोरोनाचा परिणाम झाला नसल्याचा दावा बंदराचे एचआर अवधूत सावंत यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाNavi Mumbaiनवी मुंबईJNPTजेएनपीटी