शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: शहरात कोरोनाला रोखण्यात दिघा विभाग आघाडीवर, नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 00:34 IST

Navi Mumbai coronavirus: कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविले असून, शून्य मृत्युदर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला.

- नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या उपाययोजनांना यश येऊ लागले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. कोरोनाला रोखण्यामध्ये दिघा विभाग आघाडीवर असून, २३० दिवस सातत्याने रुग्णसंख्या सर्वांत कमी ठेवण्यात यश आले आहे. नेरूळमध्ये सर्वांत जास्त रुग्ण मुक्त झाले असून, कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी घणसोलीत सर्वांत  जास्त आहे.कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविले असून, शून्य मृत्युदर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. सद्य:स्थितीमध्ये शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. बुधवारी शहरातील एकूण रुग्णसंख्या ४४,०५० झाली होती. त्यापैकी ४१,१७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, १९८६ रुग्ण शिल्लक राहिले आहेत. सर्वांत कमी रुग्ण दिघा विभागामध्ये आहेत. मार्चपासून या परिसरात १,२१९ जणांना कोरोना झाला असून, त्यापैकी १,१६६ जण उपचार घेऊन घरी गेले आहेत. ४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सद्य फक्त ५३ रुग्ण शिल्लक आहेत. १३ मार्चपासून या परिसरातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागास यश आले आहे. झोपडपट्टी परिसरातील कामगिरी लक्षणीय आहे. नवी मुंबईमध्ये नेरूळ विभागातून सर्वाधिक ७,२८१ रुग्ण बरे झाले आहेत. नेरूळमध्ये ४१४ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३.१० टक्के आहे. सर्वाधिक ४४६ रुग्ण बेलापूरमध्ये शिल्लक आहेत. शहरातील मृत्युदर २ टक्क्यांवर आणण्यात प्रशासनास यश आले आहे. 

दिवाळीमध्ये विशेष काळजी घ्या नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात येत असला तरी दिवाळीच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. सण, उत्सवामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी होऊ लागली आहे. नियमांचे पालन न केल्यास पुन्हा रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्कच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले. आयुक्त अभिजित बांगर यांनी जुलैमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर रुग्ण वाढले तरी चालतील  पण एकही मृत्यू होणार नाही यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या असून, त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिणामी, नवी मुंबईतील  कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.  

घणसोलीमध्ये सर्वाधिक ९५.११ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तेथील ५,३९७ रुग्णांपैकी ५,१३३ रुग्ण बरे झाले असून, आता फक्त १६४ रुग्ण शिल्लक आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई