शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दाखल्यासाठी रुग्णालयाबाहेर परप्रांतीयांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 23:36 IST

डॉक्टरांनी तपासणी शुल्क न वाढवण्याच्या सूचना

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : परराज्यातील व्यक्तींना मूळ गावी जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परवान्याकरिता वैद्यकीय दाखल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी शहरातील बहुतांश दवाखान्यांबाहेर दाखल्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्यांच्याकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

लॉकडाउनमुळे अडकलेल्या परराज्यातील व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार आहे, त्याकरिता पूर्वपरवानगी आवश्यक असून ती पोलिसांमार्फत दिली जाणार आहे. त्यानुसार रविवारी सकाळी नवी मुंबई पोलिसांकडून स्थानिक पोलीसठाण्यामार्फत अर्जाचे वाटप करण्यात आले. त्या अर्जासोबत संबंधितांना वैद्यकीय दाखला जोडण्यास सांगण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज हाती लागताच अनेकांनी परिसरातील दवाखान्यांबाहेर गर्दी केली.

कोरोनामुळे दीड महिन्यांपूर्वीच काही डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे प्रत्येक विभागात मोजकेच दवाखाने सुरू आहेत. त्या ठिकाणी स्वत:ची तपासणी करून घेऊन दाखला मिळवण्यासाठी परप्रांतीयांकडून गर्दी केली जात आहे. काही ठिकाणी अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. तर काही ठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता गर्दी केली जात आहे. असाच प्रकार रविवारी दुपारी घणसोली सेक्टर ४ परिसरात पाहायला मिळाला. परिसरात एकमेव दवाखाना असल्याने २००हून अधिकांनी दाखल्यासाठी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना धाव घेऊन गर्दी नियंत्रणात आणावी लागली; परंतु पुढील दिवसांत ही गर्दी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय दाखला महत्त्वाचा असल्याने काही डॉक्टरांकडून जादा शुल्क आकारून दाखला दिला जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे; परंतु काहीही करून दाखला मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना नाइलाजास्तव आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नागरिकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कोणीही तपासणीसाठी जादा शुल्क आकारू नये, अशा सूचना होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशनचे (हिम्पाम) नवी मुंबई अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे यांनी सांगितले.पोलिसांची मध्यस्तीघणसोली सेक्टर ४ परिसरात एकमेव दवाखाना असल्याने दोनशेहून अधिकांनी दाखल्यासाठी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना धाव घेऊन गर्दी नियंत्रणात आणावी लागली; परंतु पुढील काही दिवसांत ही गर्दी अधिकच वाढणार असल्याने बंद असलेले दवाखाने प्राधान्याने सुरू करण्याची गरज भासणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या