शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Coronavirus: नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन कोविड केअर सेंटर स्वयंपूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 19:11 IST

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने लवकरच येथे पोर्टेबल ऑक्सिजन जनरेशन प्लँट देखील उभारण्यात येणार असून, त्याद्वारे हे केंद्र पूर्णपणे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं.

नवी मुंबई - नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बेसमेंट मध्ये 75 आयसीयू बेडसची सुविधा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय या कोविड केंद्रात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा राहत असल्याने हे कोविड केंद्र आता स्वयंपूर्ण होणार आहे. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोविड केअर केंद्राला भेट देऊन नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधेची पाहणी केली.   

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे यापूर्वी सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये 1200 बेडसचे कोविड केंद्र यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र या सुविधेत आयसीयू बेडसचा समावेश नव्हता. त्यामुळे रुग्णाची वाढती संख्या आणि जास्तीत जास्त पेशंट्सना आयसीयू बेडसची गरज असल्याने सिडको केंद्राच्या आवारातच या 75 आयसीयू बेडसची सोय नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या नवीन सुविधेमुळे पेशंटला दूरच्या रुग्णालयात हलवण्यापेक्षा सिडको केंद्राअंतर्गतच त्याच्यावर पुढील उपचार करणे शक्य होणार आहे. रुग्ण हलवताना त्याच्या जीवाला होणारा धोका देखील त्यामुळे टळण्यास मदत होईल. यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने लवकरच येथे पोर्टेबल ऑक्सिजन जनरेशन प्लँट देखील उभारण्यात येणार असून, त्याद्वारे हे केंद्र पूर्णपणे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं.

सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये  नव्याने सुरू झालेले 75 आयसीयू बेडस आणि पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात सुरू झालेले 100 आयसीयू बेडस असे 175 आयसीयू बेडस आता रुग्णांसाठी उपलब्ध झाले असून त्याचा वापर देखील सुरू झालेला आहे. याशिवाय एकूण 3000 ऑक्सिजन बेडसही महानगरपालिकेकडून उपलब्ध करून दिल्यामुळे नवी मुंबई परिसरातील नागरिकांसाठी हा फार मोठा दिलासा ठरणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या पाहणीवेळी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याEknath Shindeएकनाथ शिंदेNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका