नवी मुंबई : शहरात सलग दुसºया दिवशी कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मनपा कार्यक्षेत्रामध्ये बळींची संख्या १४७ झाली आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. गुरूवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी दिवसभरात पुन्हा ९ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तुर्भेतील ५, घणसोलीतील २ व ऐरोलीसह वाशीतील एकाचा समावेश आहे. तुर्भे विभागामधील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. या परिसरामध्ये आतापर्यंत ९०० रूग्ण आढळले असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये शहरात १२४ रूग्ण वाढले असून एकूण रूग्ण संख्या ४५१५ झाली आहे. ८४ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २,६०३ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून उर्वरीत १,७६५ जणांवर उपचार सुरू आहेत.
CoronaVirus News: नवी मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 02:40 IST