नवी मुंबई : नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात रविवारी नवीन २३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता १३१ इतकी झाली आहे.शहरात ३३ ठिकाणी कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. रविवारी महापालिकेला १६४ जणांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात बेलापूर ९, नेरुळ ४, वाशी २, तुर्भे ४, कोपरखैरणे २ आणि घणसोली २ येथील रुग्णांचा समावेश आहे.नेरुळ येथील शिवाजीनगर झोपडपट्टीत यापूर्वी एका ६0 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचप्रमाणे तुर्भे इंदिरानगर परिसरात राहणाºया एका ३१ वर्षाच्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कोरोनाचा फैलाव आता झोपडपट्टी परिसरातसुद्धा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोपरखैरणे, बोनकोडे, घणसोली या गावांत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
coronavirus : नवी मुंबईत २३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 04:55 IST