नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात रविवारी १६९ नवीन रूग्णांची भर पडली आहे. तर गेल्या आठ दिवसांत १,१३२ जणांना लागण झाली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १0९ झाला आहे.रविवारी ५४ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या २,२४0 इतकी आहे. १५४५ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपासून रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आठ दिवसांत ऐरोली विभागात २0५ तर तुर्भे परिसरात २0६ रूग्ण वाढले आहेत. नेरूळमध्ये १६५ रूग्णांची वाढ झाली आहे. कोपरखैरणे आणि घणसोलीत अनुक्रमे १६८ आणि १४२ रूग्ण वाढले आहेत.
CoronaVirus News: नवी मुंबईत १६९ रुग्ण वाढले; आठ दिवसांत ११३२ जणांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 04:47 IST