शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

नवी मुंबईतील नागरिकांवर कोरोनामुळे मानसिक ताण, जगायचे कसे हा प्रश्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 08:46 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून आहे. गेल्यावर्षी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम होता.

योगेश पिंगळे -नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये मानसिक ताण वाढला आहे. मला कोरोना झालाय, मी बरा होईन ना, मी सर्व काळजी घेतली होती, तरी कसा कोरोना झाला, असे अनेक प्रश्न कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पडत आहेत. त्यांच्यात एक पॅनिक परिस्थिती निर्माण झाली असून, रोजगार बंद असल्याने या काळात जगायचे कसे, असादेखील प्रश्न पुढे उभा राहिला आहे. नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मानसोपचारतज्ज्ञांची टीम तयार केली असून, कॉल सेंटरच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून आहे. गेल्यावर्षी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम होता. त्यामुळे एखादा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यावर त्याच्याकडे पाहण्याचा तसेच त्याला मदत करण्याचा दृष्टिकोन नागरिकांमध्ये नव्हता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाबत असलेले अनेक संभ्रम दूर झाले आहेत; परंतु या लाटेमध्ये कोविडबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने वेगळी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केल्याने अनेकांचे रोजगार बंद आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या असून, उत्पन्न बंद असल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हफ्ते, घरभाडे, विद्युत बिल, औषधोपचार आदी खर्च कसा करायचा, याची चिंता लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, या काळात कुटुंबातील व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आता नक्की काय करायचे, कुटुंबातील इतर व्यक्तींना बाधा तर होणार नाही ना, रुग्णालयात बेड मिळेल का, शारीरिक जुन्या काही व्याधी असल्याने मला काही होईल का, मला काही झाल्यास माझ्या कुटुंबाचे कसे होणार, असे अनेक प्रश्न पॉझिटिव्ह व्यक्तींच्या मनात निर्माण होत आहेत. नागरिकांचे समुपदेशन करून मनोबल वाढविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून हेल्पलाइनची सुविधा सुरू करून देण्यात आली आहे. विविध प्रश्नांसाठी नागरिक हेल्पलाइनवर कॉल करीत असून, मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांचे कौन्सिलिंग  करून रिलॅक्सेशन थेरपी दिली जात आहे. तसेच त्या रुग्णांचा  पुन्हा फॉलो अप घेऊन त्यांची विचारपूस करून धीर दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांसाठी तयार केलेली कौन्सिलिंगची हेल्पलाइन सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.  

रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय.. काय करू?कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर अनेक रुग्ण पॅनिक होतात. त्यावेळी आता नेमके काय करायचे हे कळत नसल्याने तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींच्या काळजीपोटी हेल्पलाइनवर कॉल करून शंकांचे निरसन आणि मार्गदर्शन करून घेतात.  

कॉल करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक पुरुष सहसा व्यक्त होत नाहीत; परंतु कोरोनामुळे अनेक कुटुंबे बाधित झाली असून, कोविड रुग्णांमध्ये डिप्रेशन वाढले आहे. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी किंवा मनात येणाऱ्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी नागरिक हेल्पलाइनवर कॉल करीत असून, यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

मागच्या वर्षी कोरोनामध्ये नागरिकांची मानसिक स्थिती वेगळी होती. परंतु या लाटेमध्ये कोविड झाला म्हणजे आपल्या आयुष्याचे काही तरी होत आहे, असा समज कोविड रुग्णांमध्ये निर्माण होतो. कोविड आपल्यासाठी आता नवीन राहिलेला नाही. त्यामुळे चिंता न करता काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सुरक्षा नियमांचा वापर करणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही शंका असल्यास चिंता करण्याची गरज नाही. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. - डॉ. योगीता सोळंके, मानसोपचारतज्ज्ञ

तरुणांना कुटुंबाची काळजी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यास त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांनादेखील कोरोनाची लागण होईल का, किंवा आपल्याला काही झाल्यास आपल्या कुटुंबाचे काय होईल, असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहत असून, ते मानसिक तणावाखाली येत आहेत. अशा व्यक्तींना हेल्पलाइनच्या माध्यमातून मानसोपचारतज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या कौन्सिलिंगमुळे खूप फायदा होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबईdoctorडॉक्टर