शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

corona vaccination :७२ दिवसांमध्ये ८७ हजार नागरिकांचे लसीकरण, नवी मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 00:27 IST

corona vaccination: नवी मुंबई शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात करून ७२ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये ८७ हजार ७३० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

नवी मुंबई : शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात करून ७२ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये ८७ हजार ७३० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मनपा क्षेत्राची लोकसंख्या जवळपास १४ लाख असून, प्रत्येक नागरिकांना वेळेत लस मिळवून देण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची मागणी केली जात आहे. रिक्षा चालक संघटनांनीही सर्व चालकांना लस देण्याची मागणी केली आहे.       कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. नवी मुंबईमध्ये १६ जानेवारीपासून आतापर्यंत २३ हजार ६५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.  पोलीस व इतर पहिल्या फळीतील १६,५९७ जणांना व ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याशी असणाऱ्या ४८ हजार ६८ जणांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ८७,७३० जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून, यामधील १८,९१२ जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. वास्तविक शहराची लोकसंख्या १४ लाख आहे. प्रत्येक नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यायची असेल, तर लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  शासन व महानगरपालिकेने आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याधी असणारांना लस देण्यात आली आहे. शहरातील सर्व रिक्षा चालकांनाही लस देण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे यंशयित रुग्ण व अनेक पॉझिटिव्ह आलेले रुग्ण चाचणीपूर्वी शहरातील रिक्षाने प्रवास करत असतात. रिखा चालकांचा अनेक नागरिकांशी संपर्क येत असते. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त रिक्षा चालक असून, त्या सर्वांना लस द्यावी, अशी मागणी चालकांनी केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रिक्षा व्यवसायाचा समावेश आहे. शहरात जवळपास ३० हजार रिक्षा चालक व्यवसाय करत आहेत. या सर्वांचा दिवसभर अनेक नागरिकांशी संपर्क येत असतो. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कोरोना लस देण्यात यावी. - दत्तात्रय फडतरे, सचिव, नेरुळ विभाग कल्याणकारी संस्था

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNavi Mumbaiनवी मुंबई