शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination: कोरोना लसीकरणात प्रतिसाद वाढल्याने नवी मुंबईची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 23:49 IST

Corona vaccination in Navi Mumbai : कोरोना लसीकरणाला नवी मुंबईमध्ये प्रतिसाद वाढू लागला आहे. प्रतिदिन निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टापैकी सरासरी ८९ टक्के उद्दिष्ट साध्य होऊ लागले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई -  कोरोना लसीकरणाला नवी मुंबईमध्ये प्रतिसाद वाढू लागला आहे. प्रतिदिन निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टापैकी सरासरी ८९ टक्के उद्दिष्ट साध्य होऊ लागले आहे. शहरात ११ केंद्र सुरू केली असून, नवीन केंद्र वाढविण्याची परवानगी महानगरपालिकेने केली असून, लवकरच पोलीस व मनपा कर्मचारी यांनाही लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे.नवी मुुंबईमध्येही सुरुवातीला कोरोना लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु आयुक्त अभिजीत बांगर यांनी तत्काळ लसीकरणाविषयी शंकांचे निरसर केल्यामुळे व लस घेतलेल्यांचे अनुभव प्रसारित केल्यामुळे शहरात लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला आहे. पहिल्या टप्यात १७ हजारपेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी यांना लस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सुरुवातीला पाच ठिकाणी केंद्र होती. आता ११ केंद्र सुरू केली आहेत. २९ जानेवारीपर्यंत ६,१०० जणांपैकी ५,४२४ जणांना लस देण्यात आली होती. एकूण उद्दिष्टापैकी हे प्रमाण ८९ टक्के आहे. महानगरपालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारी व इतर अभियान मनपाने यशस्वीपणे राबविले होते. याच पद्धतीने लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात येत आहे. आयुक्त अभिजीत बांगर हे स्वत: नियमित आढावा घेत आहेत. आवश्यक त्या सुधारणा सुचविल्या जात आहेत. लसीकरणाबाबत काही शंका असतील, तर त्या तत्काळ साेडविण्याच्या सूचनाही करण्यात येत आहेत.महिला कर्मचाऱ्यांचाही प्रतिसादनवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचाही लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी केेलेल्या कर्मचारी लसीकरणास उपस्थित राहात आहेत. काही शंका असल्यास त्यांचे निरसन केले जात आहे. यामुळे लसीकरण सुरळीत सुरू असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नवी मुंबई पालिका क्षेत्रात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नवीन केंद्र वाढविण्यासाठी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबतच पोलीस व मनपा कर्मचारी यांनाही लवकरच लस देण्यात येणार आहे. लसीचा पुरेसा साठा असून, आवश्यकतेप्रमाणे लसीचा दुसरा साठा मागविण्यात येणार आहे.- अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका मनपाकडे ४० हजार डोसमहानगरपालिकेकडे ४० हजार डोस प्राप्त झाले आहेत. २० हजार नागरिकांना लस देता येईल एवढे ढोस उपलब्ध आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबर पोलीस व मनपा कर्मचारी यांना लस देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी प्रशासनाने शासनाकडे केली आहे. सद्यस्थितीत लसीचे डोस पुरेशा प्रमाणात असून, आवश्यकतेप्रमाणे डोसचा दुसरा साठा मागविण्यात येणार आहे.महानगरपालिका क्षेत्रात सद्यस्थितीत ११ केंद्र आहेत. शहरात अजून नवीन केंद्र सुरू करण्याची क्षमता मनपाकडे आहे. यामुळे नवीन केंद्रांना परवानगी मिळावी, अशी मागणीही महानगरपालिकेने केली आहे. लसीकरण मोहीम गतीने राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNavi Mumbaiनवी मुंबई