शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली येथील शाळेत गंध, टिकलीस मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 23:57 IST

विद्यार्थ्यांना सक्ती न करण्याची मागणी

कळंबोली : कळंबोलीतील कारमेल कॉन्व्हेंट शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गंध, टिकली, तसेच नेलपेंट लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त होत असल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याध्यापिकेची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. अशा प्रकारे सक्ती न करण्याची मागणी या वेळी करण्यात आली आहे.कारमेल कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थ्यांवर अनेक निर्बंध लादले आहेत. गंध, टिकली, नेलपेंट, हातावर मेहंदी लावण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे धागे-दोरेही बांधू दिले जात नाहीत. यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दीपक निकम, आत्माराम गावंड, प्रकाश चांदिवडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका एम. सुश्मिता यांची भेट घेत निवेदन दिले. एखाद्याच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा अधिकार व्यक्ती, संस्था किंवा शाळेला नाही. इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाºया धोरणांचा निवेदनात कडक शब्दात निषेध व्यक्त केला.आपल्या धर्माबरोबरच इतर धर्मांबद्दलही आदर राखणे हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. कारमेल कॉन्व्हेंट शाळेने विद्यार्थ्यांची संस्कृती जतन करण्याच्या अधिकारावर गदा आणणे चुकीचे आहे.- रामदास शेवाळे,पनवेल महानगरप्रमुख, शिवसेनाशाळेचे नियम ठरलेले आहेत. त्याचे पालन बंधनकारक आहे. हा एक शिस्तीचा भाग आहे. बाहेर किंवा घरी विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी जरूर कराव्यात; परंतु शाळेत नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आम्हाला निवेदन दिले आहे, त्याप्रमाणे व्यवस्थापनाला कळविण्यात येईल.- एम. सुश्मिता, मुख्याध्यापिका