शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा हस्तांतरणाचा वाद, पनवेल पालिकेच्या गठीत समितीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:50 IST

शहरातील सिडको नोडमधील आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला पालिकेने गठीत केलेल्या समितीने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडणार आहे. आरोग्य सेवा हस्तांतरित झाल्यानंतर पालिकेवर पडणारा भुर्दंडाचा विचार करून या समितीच्या सदस्यांनी या हस्तांतरण प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे.

वैभव गायकर पनवेल : शहरातील सिडको नोडमधील आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला पालिकेने गठीत केलेल्या समितीने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडणार आहे. आरोग्य सेवा हस्तांतरित झाल्यानंतर पालिकेवर पडणारा भुर्दंडाचा विचार करून या समितीच्या सदस्यांनी या हस्तांतरण प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे.१ आॅक्टोबरपासून सर्व आरोग्याच्या सोयी-सुविधा पालिकेकडे वर्ग करण्यात येणार असल्या तरी याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याने रहिवासी संभ्रमात आहेत. सिडको नोडमध्ये आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून कचरा, गटारे तसेच सांडपाणी हे प्रश्न रहिवाशांना भेडसावत आहेत. सिडकोकडे सक्षम मनुष्यबळ असतानाही पुरेशी आरोग्य सेवा देण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे नुकत्याच स्थापना झालेल्या पनवेल महापालिकेची प्रभावी आरोग्य यंत्रणा उभी राहण्यास विलंब होत असल्याने समन्वय समितीने हस्तांतरणास विरोध दर्शवला आहे.गुरुवारी सिडको भवनात सहव्यवस्थपाकीय संचालक राजेंद्र चव्हाण, खारघर कळंबोली शहराचे प्रशासक सीताराम रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या समितीची बैठक पार पडली. बैठकीतही आरोग्य सेवा हस्तातंरण प्रक्रियेला विरोध दर्शविला. सिडकोच्या विविध विभागापेक्षा आरोग्य विभागाच्या मार्फत कमी उत्पन्न सिडकोला प्राप्त होत असल्याने सिडकोला हे विभाग हस्तांतरित करण्याची घाई झाल्याचे बोलले जात आहे.सिडको क्षेत्रात कचरा सेवा गंभीर बनत चालली आहे. डम्पिंग ग्राउंड कोणत्याही क्षणी बंद पडू शकते, त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी देखील शुक्रवारी सभेत सिडकोच्या आरोग्य विभागाच्या हस्तांतरण प्रक्रि येला विरोध दर्शविला आहे. सिडकोने यासाठी महापालिकेला सहा महिन्यांचा अवधी द्यावा, त्याकरिता येणारा खर्चही करावा, कचरा, आरोग्य सेवा, कुत्र्यांचे निर्बीजीकरण या सर्वांचे योग्य आॅडिट होणे गरजेचे असल्याची मागणी या वेळी ठाकूर यांनी केली.>विविध विभागापेक्षा आरोग्य विभागामार्फत कमी उत्पन्न सिडकोला प्राप्त होत असल्याने सिडकोला हा विभाग हस्तांतरित करण्याची घाई झाली आहे. सिडको क्षेत्रात कचरा सेवा गंभीर आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. डम्पिंग ग्राउंडदेखील कोणत्याही क्षणी बंद पडू शकते त्यामुळे हा निर्णय पालिकेच्या पथ्यावर पडू शकतो. एकीकडे १२.५ टक्के योजनेची योग्यरीत्या अंमलबजावणी झाली नाही. सिडकोने पालिकेला कोणत्याही प्रकारचे आरक्षित भूखंड सोडले नाहीत.- नगरसेवक अरविंद म्हात्रे, सदस्य सिडको समन्वय समिती पनवेल महानगर पालिका.>सिडको आणि महापालिका या दोन्ही प्रशासनाच्या माध्यमातून समन्वयाने हा निर्णय घेतला जाईल. नागरिकांना याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल .- मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको