शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी नाकारल्याने ठेकेदारावर ब्लेडने वार, ऐरोलीतली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 22, 2024 18:35 IST

आकाश यादव (३२) असे हल्ल्या जखमी झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

नवी मुंबई : बुद्ध विहाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे खंडणी मागूनही त्याने नाकारल्याने त्याच्यावर वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये ठेकेदार जखमी झाला असून एकावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आकाश यादव (३२) असे हल्ल्या जखमी झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्यांना गतवर्षी ऐरोली सेक्टर २ येथे बुद्ध विहार उभारणीचे काम मिळाले होते. त्यानुसार ते त्याठिकाणी काम करत असताना चेतन चव्हाण नावाच्या तरुणाने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. विभागात काम करायचे असेल तर आपल्याला पैसे द्यावे लागतील असे त्याने धमकावले होते. परंतु यादव यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत पैसे नाकारले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा त्याने फोन करून यादव यांच्याकडे पैशाची मागणी केली होती असा त्यांचा आरोप आहे. त्यावेळी देखील त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता.

रविवारी दुपारी चेतन याने यादव यांना फोन करून एका घराच्या कामाच्या बहाण्याने त्यांना भेटीसाठी बोलवले होते. त्यानुसार दोघे समोरासमोर भेटले असता झालेल्या वादातून चेतन याने ब्लेडने यादव यांच्यावर वार केले. तसेच त्याने आपल्याकडे असलेली ४८ हजाराची रोकड देखील लुटून नेल्याचंही आरोप त्यांनी केला आहे. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात उपचार घेऊन पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार चेतन चव्हाण याच्यावर सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु असल्याचे रबाळे पोलिसांनी सांगितले 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी