शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या संचलनासाठी सिडकोला मिळेना ठेकेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:36 IST

निविदांना प्रतिसाद नाही; एमएमआरडीए इच्छुक, प्रस्ताव केला सादर

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षभरात या मार्गावर प्रत्यक्षात मेट्रो सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. मात्र मेट्रोचे संचलन आणि देखभालीसाठी कोणतीही कंपनी पुढे येताना दिसत नाही. यातच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीएने) मेट्रोची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोची ‘ट्रायल रन’ घेण्यात आली होती. त्यामुळे डिसेंबर २०१९ पर्यंत नवी मुंबईत मेट्रो धावणार, असे चित्र रंगवण्यात आले होते. मात्र, मेट्रोतून प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न साकार होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते पेंधर मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. मेट्रोच्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी अनेक स्थानकांचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे मेट्रोचे संचलन आणि देखभालीसाठी ठेकेदार नेमण्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या होत्या. या निविदांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सिडकोसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. सिडकोच्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरडीएने नवी मुंबई मेट्रो चालविण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे.महामुंबई मेट्रो आॅपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही एमएमआरडीएची उपकंपनी आहे. या उपकंपनीच्या माध्यमातून नवी मुंबई मेट्रोचे संचलन आणि देखभाल करण्याची तयारी एमएमआरडीएने दर्शविली आहे. तसा प्रस्ताव सिडकोला सादर करण्यात आला आहे. मात्र त्यावरसुद्धा अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते.उत्पन्नातील भागीदाराच्या प्रमाणावर चर्चामेट्रो प्रकल्पाचा संपूर्ण खर्च सिडकोच्या माध्यमातून केला जात आहे. आतापर्यंत जवळपास ३ हजार कोटी रुपये सिडकोने खर्च केले आहेत. त्यामुळे मेट्रो एमएमआरडीएला चालविण्यासाठी दिल्यास त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भागीदारीचे प्रमाण कसे असेल, याबाबत दोन्ही प्राधिकरणांकडून विचार सुरू असल्याचे समजते.असे असले तरी मेट्रो हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो चालविण्यासाठी एखाद्या खासगी संस्थेला देण्यात सिडकोला रस नाही. त्यामुळे खासगी ठेकेदार नियुक्त करून स्वत:च्या नियंत्रणाखाली मेट्रोची सेवा पुरविण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू असल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.

टॅग्स :Metroमेट्रोNavi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको