शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई शहरात पावसाची संततधार; ठिकठिकाणी साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:16 IST

७८.६६ मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई : गणेशोत्सव सुरू झाल्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाची संततधार शुक्रवारी, २८ आॅगस्ट रोजी सकाळपासूनच सुरू झाली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. दिवसभरात शहरात ७८.६६ मिमी पावसाची नोंद झाली.

सानपाडा येथील रेल्वे पुलाखाली, तसेच मॅफको मार्केटमध्ये पावसाचे पाणी साचले होते. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या. शुक्रवारी सातव्या दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन असल्याने, विसर्जनासाठी तलावांवर येणाऱ्या भक्तांची धावपळ झाली. पावसामुळे सकाळी कामावर जाताना, तसेच संध्याकाळी घरी परतत असताना नागरिकांची धावपळ उडाली. बेलापूर ७३.०८ मिमी, नेरुळ ७५.०४ मिमी, वाशी ९१.०५ मिमी, कोपरखैरणे ९०.०८ मिमी आणि ऐरोली विभागात ६१.०८ मिमी पावसाची नोंद झाली.पनवेलमध्ये ९० मिमीपेक्षा जास्त पाऊसपनवेलमध्ये मागील काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी सखल भागात पाणी साचले होते. दिवसभरात ९० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

अनेकांनी गणेशेत्सवात घरीच थांबणे पसंत केल्याने मुसळधार पावसात रस्त्यावर नेहमीपेक्षा कमीच गर्दी दिसली. गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेला पावसाचा जोर शुक्रवारी कायम होता. दरम्यान, तालुक्यातील गाढी, कसाडी या नद्या यावेळी ओसंडून वाहत असल्याचे पाहावयास मिळाले. तालुक्यात एक दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सायन-पनवेल, कळंबोली-मुंब्रा, मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले.

टॅग्स :Rainपाऊस