शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

दिव्यांगांसाठी ऑनलाइन प्रणाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:12 IST

महापालिकेचा उपक्रम; स्वीकारमुळे दिव्यांगांची माहिती संकलित होणार

नवी मुंबई : दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्या यासाठी महापालिकेने ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. शहरातील सर्व दिव्यांगांची माहिती संकलित करावी व नोंदणी करता यावी यासाठी महापालिकेने स्वीकार ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे.यापुढे महापालिकेच्या संकेतस्थळावर शहरातील दिव्यांग व्यक्ती आपले नाव नोंदवू शकतात. अपंग अधिनियम २0१६ नुसार मतिमंदत्व, स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी, मानसिक रोगी, कर्णबधिरत्व, वाचा व भाषा दिव्यांगत्व, अंधत्व, अल्प दृष्टी, अस्थिव्यंग, कुष्ठरोगमुक्त, बुटकेपण, अ‍ॅसिड हल्ला बळी, मांसपेशी दुर्विकास, अध्ययन अक्षमता, बौध्दिक दिव्यांगत्व,मल्टिपल स्कलेरोसिस, पार्किंन्सस, हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल आजार विकलांग, बहु दिव्यांग हे २१ दिव्यांग प्रवर्ग असून यामध्ये असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी संकेतस्थळावर केली जाऊ शकते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महापौर जयवंत सुतार व आयुक्त रामास्वामी एन. यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारची सुरवात करण्यात आली.या प्रणालीचा उपयोग दिव्यांगाकरिता राबविण्यात येणाºया विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता तसेच दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र उपलब्ध करून घेण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींची एकत्रित माहिती संकलित होणार असल्याने त्याचा उपयोग विविध प्रकारचे सेवाभावी काम करण्यासाठी पालिकेला होणार आहे. अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत २६ जानेवारीपासून ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ अंतर्गत ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय शिबिरे आयोजन करण्यात येत आहेत.पालक सुसंवादी अ‍ॅपमहानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालकांना शाळेशी जोडण्यासाठी एनएमएमसी ईडीयू स्मार्ट हे अभिनव मोबाइल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.या अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती, प्रगती, परीक्षेचे वेळापत्रक, शाळेकडून देण्यात येणाºया सूचना, निकाल, पालक सभा व इतर माहिती देण्यात येणार असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या अ‍ॅपची सुरवात करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका