पनवेल : रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. तीन दिवसीय स्पर्धेत ४५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली गट, दुहेरी गट, मिश्र दुहेरी गटात होत आहे. रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा बॅडमिंटन बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डॉ. डेव्हिड अल्वारीस, उपाध्यक्ष रवींद्र भगत, शिवकुमार के. के., खजिनदार नरेंद्र जोशी, युवानेते किशोर पाटील, सुधीर ठाकूर यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडारसिक उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार, ९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे.
पनवेलमध्ये बॅडमिंटन स्पर्धा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:58 IST