शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

सी-लिंक प्रकल्पाची सामुग्री जेएनपीटी बंदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:01 IST

फॅब्रिकेटेड आॅर्थोट्रॉपिक स्टील गर्डर्स प्राप्त झाल्याने पुलाचे बांधकाम वेगाने होणार असून, साइटवर डेकशी संबंधित कामही कमी होणार आहे.

मधुकर ठाकूर।

उरण : नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी बंदर आणि पुण्यात मुंबईहून जलदगतीने पोहोचण्यासाठी सुरू असलेल्या शिवडी-न्हावा-शेवा मुंबई ट्रान्स हार्बर सी-लिंक प्रकल्पासाठी लागणारी लाखो टनाची सामुग्री जेएनपीटी बंदरात गुरुवारी उतरविण्यात आली आहे. हाय फोन्ग बंदरामधून लोड केलेली ही सामग्री एल अँड टी आयएचआयच्या कंसायन्मेंटद्वारे आयात करण्यात आली आहे.

फॅब्रिकेटेड आॅर्थोट्रॉपिक स्टील गर्डर्स प्राप्त झाल्याने पुलाचे बांधकाम वेगाने होणार असून, साइटवर डेकशी संबंधित कामही कमी होणार आहे. आयात करण्यात आलेल्या या अवजड सामुग्रीमुळे प्रकल्पाचे काम अधिक वेगाने होण्यास फार मोठी मदत होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईला जेएनपीटी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडले जाणार आहे, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठीही कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. जेएनपीटीसाठीही एक मोठी उपलब्धी आहे. कारण ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून नवी मुंबई ते मुंबईची दरम्यान निर्माण होणारी कनेक्टिव्हिटी मुंबई आणि उपनगरांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. हा पूल तयार झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत अत्यंत कमी वेळेत पोहोचणे सहज शक्य होणार आहे.मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील सर्वांत लांबीचा सागरी पूल आहे. मुंबईतील शिवडीशी जोडणाऱ्या २२ किलोमीटर

लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलासाठी १० हजारांहून अधिक गर्डरचा वापर केला जाणार आहे. त्यातील सुमारे १६.५ कि.मी. लांबीचा हिस्सा हा समुद्रात तर उर्वरित हिस्सा जमिनीवर असणार आहे. १०३३ मे.टन वजनाचे कॉलम, सपोर्टिंग स्ट्रक्चर आणि गर्डर्स - पूल बांधण्यासाठी वापरले जाणारे कंपाउंड स्ट्रक्चर असलेली ८४ पॅकेज जेएनपीटी बंदरात दाखल झाले आहेत. ‘एमव्ही पायोनियर ड्रीम’ या जहाजातून मोठ्या संख्येने दाखल झालेली सामुग्री उतरविण्यासाठी साडेपस्तीस तासांचा अवधी लागला.आवश्यक साहित्य आयातच्एमएमआरडीएने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठीचे (पॅकेज -१) शिवडी इंटरचेंजसहित मुंबई खाडीमध्ये १०.३८० किलोमीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामाचे काम एल अँड टी आणि आयएचआय कंसायन्मेंटद्वारे देण्यात आले आहे. हाय फोन्ग बंदरामधून लोड केलेली हीसामुग्री एल अँड टी आयएचआयच्या कंसायन्मेंटद्वारे आयात केली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण