शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

बनावट सिमकार्डवरून मलेशियात संपर्क

By admin | Updated: August 12, 2015 01:11 IST

व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीवर नवी मुंबई पोलिसांनी मोक्का लावला आहे. या टोळीच्या चौघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

नवी मुंबई : व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीवर नवी मुंबई पोलिसांनी मोक्का लावला आहे. या टोळीच्या चौघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यापैकी एक जण मलेशियातील अफताब आलम ऊर्फ हाजीच्या संपर्कात होता.नवी मुंबईसह मुंबईच्या व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या चौघांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत ते रवी पुजारी टोळीसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. या टोळीने केलेल्या गुन्ह्याच्या तीव्रतेमुळे त्यांच्यावर मोक्का लावण्याचे पाऊल नवी मुंबई पोलिसांनी उचलले आहे. त्यामध्ये रवी पुजारीसह त्याचा हस्तक अफताब आलम ऊर्फ हाजी व अटकेत असलेला नदीम काझी (४९), प्रशांत मुल्या (२६), केशव भणगे (२८) आणि विनायक पालवे यांचा समावेश आहे. अफताबच्या नेतृत्वाखाली काझी हा नवी मुंबईत पुजारी टोळीचे काम पाहत होता. तो व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकवायचा. काझी हा सातत्याने मलेशियात लपलेल्या अफताब आलम ऊर्फ हाजीच्या संपर्कात होता. याकरिता तो मित्रांच्या नावाचे बनावट सिमकार्ड वापरत होता. अशी अनेक सिमकार्ड्स पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केली आहेत. काझीने मित्रांना विश्वासात घेऊन दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांच्याकडून वापरासाठी हे सिमकार्ड घेतलेले होते. हे मोबाइल त्याने घरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते.ठरल्याप्रमाणे त्याचे साथीदार प्रशांत, केशव व विनायक हे शहरात इस्टेट एजंट म्हणून वावरत होते. यादरम्यान एखादा मोठा व्यवहार समोर आल्यास त्या व्यावसायिकाची माहिती काझी हा मलेशियाला हाजीपर्यंत पोचवायचा. (प्रतिनिधी)इस्टेट एजंट पोलिसांच्या रडारवरइस्टेट एजंटचा व्यवसाय करणाऱ्यांनाही नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र केवळ मध्यस्थीच्या या कामात अधिक उत्पन्न असल्याने कर वाचवण्यासाठी अनेक जण या व्यवसायाची नोंद करत नाहीत. शिवाय त्यांच्यावर कसलेही बंधन नसल्याचाही फायदा त्यांना होतो. त्यामुळेच पुजारी टोळीचे तिघेही शहरात इस्टेट एजंटचे काम करत होते. परंतु या प्रकारामुळे इतरही इस्टेट एजंट पोलिसांच्या रडारवर आले आहेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारात हात धुऊन घेणाऱ्या या एजंटमध्ये अनेकजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचीही शक्यता आहे.