शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मोकळ्या भूखंडावर बांधकाम साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:26 IST

महापालिकेच्या स्वच्छता अभियानात खोडा, कारवाईकडे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरात सध्या स्वच्छता अभियानाचा जागर सुरू आहे. महापालिकेने त्यासाठी कंबर कसली आहे; परंतु अनेक ठिकाणी या मोहिमेत अडथळा आणण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न काही बेकायदा व्यावसायिकांकडून होताना दिसत आहेत. कोपरखैरणे रेल्वेस्थानक परिसरातील सिडकोच्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे, त्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने स्वच्छ अभियानाला त्याचा मोठा अडथळा निर्माण होताना दिसत आहे.महापालिका आणि सिडकोने शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून रस्त्यावरील डेब्रिज, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर अंकुश आणला जात आहे. विनापरवाना होर्डिंग लावण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे; परंतु शहराच्या काही भागांत या मोहिमेला सपशेल हरताळ फासला जात असल्याचे पाहावयास मिळते.कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथील शिव शंकर सोसायटीच्या जवळच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य विक्रीसाठी साठवून ठेवले आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग पुढे थेट रेल्वेस्थानकापर्यंत जातो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच पादचाºयांची गर्दी असते. तसेच या मार्गाच्या लगत असलेल्या सिडकोच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवरही बांधकाम साहित्यविक्रेत्यांनी बेकायदेशीर कब्जा केला आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणाºया विटा, रेती तसेच खडीचे ढीग साचले आहेत. याचा नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लगात आहे.स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने संपूर्ण शहर कचरामुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार संबंधित विभाग कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. सफाई कर्मचारी तीन-तीन शिफ्टमध्ये शहराची साफसफाई करीत आहेत; परंतु अनधिकृतपणे पदपथ, रस्ते आणि मोकळ्या मैदानावर डम्प केलेल्या बांधकाम साहित्यांकडे मात्र महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.सिडको किवा महापालिकेच्या जागेवर कोणी अतिक्र मण करून बांधकाम साहित्य ठेवून पादचाºयांच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा लोकांविरोधात त्वरित कारवाई केली जाईल. सध्या महापालिकेचे स्वच्छ भारत अभियान सुरू आहे, त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत या संदर्भात धडक कारवाई मोहीम सुरू केली जाईल.- अशोक मढवी,सहायक आयुक्त,कोपरखैरणे विभाग.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई