शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समिती सदस्य निवडीवरून महासभेत विरोधकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 01:05 IST

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहेत, या सहा रिक्त झालेल्या जागांवर नव्याने सहा सदस्यांची निवड महासभेत होणार होती यासाठी यामध्ये राष्ट्रवादीचे ५, काँग्रेस १, शिवसेनेचे २ असे एकूण आठ उमेदवार रिंगणात होते.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यांची शनिवार, २९ जून रोजी झालेल्या महासभेत निवड करण्यात येणार होती. सदस्य निवडीसाठी मतदानाने निवड होणार असल्याने शिवसेना सदस्यांनी महासभेत गोंधळ घालून महापौरांना घेराव घातला. गोंधळानंतर पार पडलेल्या निवडणूक प्रक्रि येत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी झाले.नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहेत, या सहा रिक्त झालेल्या जागांवर नव्याने सहा सदस्यांची निवड महासभेत होणार होती यासाठी यामध्ये राष्ट्रवादीचे ५, काँग्रेस १, शिवसेनेचे २ असे एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. याआधी नवी मुंबई महापालिकेतील विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार परिवहन समितीमध्ये सदस्यांची निवड व्हायची; परंतु या वेळी मात्र सदस्य निवडीसाठी मतदान केले जाणार असल्याने नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या वेळी या विषयावर चर्चा करताना शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी नवी मुंबई महापालिकेत आजपर्यंत ज्या पद्धतीने परिवहन सदस्यांची निवड केली जात होती, त्याप्रमाणे या वेळीही निवड करण्याची महापौरांना विनंती केली; परंतु महापौर जयवंत सुतार यांनी मतदान होणार असल्याचे जाहीर करून प्रक्रि या सुरू केल्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालत विषयपत्रिका फाडून महापौरांना घेराव घातला. महापौर सुतार यांनी सदस्यपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे घोषित केल्यावर नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये काँग्रेसचे रणजित सिंह धालीवाल, राष्ट्रवादीचे चंद्रकांत अगोंडे, निरंत पाटील, दिलीप म्हात्रे, आत्माराम पाटील, भालचंद्र वाडकर या उमेदवारांना राष्ट्रवादी आणि काँग्रेच्या ६३ नगरसेवकांनी मतदान केले. गोंधळानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केल्याने शिवसेनेच्या अतुल कुलकर्णी, प्रकाश चिकणे या दोन सदस्यांना मते मिळाली नाहीत. त्यानंतर या मतप्रक्रियेत विजयी झालेल्या सदस्यांचे महापौरांनी अभिनंदन केले.राजदंड पळवलापरिवहन समिती सदस्य निवडीवर महासभेत झालेल्या गोंधळात शिवसेना नगरसेवकांनी राजदंड पळवून सभागृहाबाहेर नेला. या वेळी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ यांनी राजदंड पळविणाऱ्या नागरसेवकांवर कारवाईची मागणी केली; परंतु काही वेळात राजदंड पुन्हा सभागृहात आणण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका