शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशन परिसराला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:34 IST

सिडकोने नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांची दिवसेंदिवस दुरवस्था होऊ लागली आहे.

- अनंत पाटील नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांची दिवसेंदिवस दुरवस्था होऊ लागली आहे. जागोजागी निखळलेले प्लॅस्टर, गळणारे छप्पर, खराब झालेले अग्निशमन यंत्रणेचे बॉक्स, पाण्याची टंचाई, तुटलेल्या टाईल्स, अर्धवट संरक्षण भिंतीची समस्या यामुळे अक्षरश: दुर्दशा झाली आहे. दररोज येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.ठाणे-वाशी-पनवेल रेल्वे मार्गावर मोठा गाजावाजा करत १२ डब्यांची लोकल सुरू करणाºया रेल्वे प्रशासनाने स्थानकांमध्ये सिडकोने सोयी-सुविधा दिल्या. मात्र स्थानकाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे सिडकोचे दुर्लक्ष होत असल्याने नवी मुंबईतील रेल्वे स्थानकात समस्यांचे प्रमाण वाढले आहे. बेलापूर, नेरु ळ, जुईनगर,सीवूड, वाशी, सानपाडा अशा स्थानकांची पुरेशा देखभालीअभावी अक्षरश: दुरवस्था झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या तुलनेत सिडकोने नवी मुंबईत अतिशय भव्य अशी रेल्वे स्थानके उभारली आहेत. या रेल्वे स्थानकांच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेने स्वीकारावी, अशी सिडकोची अपेक्षा आहे. मात्र, देखभाल, दुरुस्तीच्या कामावरून सिडको आणि रेल्वे प्रशासनात मतभेद आहेत. या मतभेदांमुळे रेल्वे स्थानकांना अक्षरश: गळती लागली आहे. सिडको आणि रेल्वेने मतभेद मिटवून रेल्वे स्थानकांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे स्थानकाबाहेर मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात आलेले आहे, रेल्वेच्या अर्धवट संरक्षण भिंतीमुळे रेल्वे लाइन ओलांडताना अपघाताची शक्यता टाळता येत नाही. तसेच शॉर्टकटचा मार्ग काढून विनातिकीट प्रवास करणाºया फुकट्या प्रवाशांची चांदी होते.वाशी रेल्वे स्थानकातील अग्निशमन यंत्रणा बॉक्स रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून गंजून सडलेल्या अवस्थेत आहे. त्याकडे रेल्वे आणि सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.>वाशी रेल्वे स्थानक परिसरात सिडकोच्या वतीने रेल्वेच्या प्रवाशांसाठी सेवा सुविधा पुरविलेल्या आहेत. काही ठिकाणी अग्निशमन यंत्रणेचे बॉक्स खराब झालेले आहेत, तर पिण्याचे पाणी आम्ही नियमित चालू ठेवतो, मात्र काही टवाळखोर आणि माथेफिरू तसेच भिकाºयांकडून अनेकदा नळ चोरीला जाण्याचे प्रकार घडलेले आहेत. आता असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाईल.- सुदर्शन खुराना, स्टेशन व्यवस्थापक, वाशी रेल्वे स्टेशन