शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

सुनेची मनधरणी करण्यासाठी आलेल्या सासूचे हाल; लॉकडाउनमुळे कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 04:52 IST

दीड महिन्यापासून त्या नेरुळ गावदेवी परिसरात उघड्यावर राहत आहेत. सुनेने घरातून हाकलून दिले, त्याच दिवशी लॉकडाउन लागू झाल्याने त्या अडकून पडल्या आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : रुसून आलेल्या सुनेची मनधरणी करण्यासाठी आलेल्या सासूवर कचऱ्यातील अन्न शोधून खायची वेळ आली आहे. दीड महिन्यापासून त्या नेरुळ गावदेवी परिसरात उघड्यावर राहत आहेत. सुनेने घरातून हाकलून दिले, त्याच दिवशी लॉकडाउन लागू झाल्याने त्या अडकून पडल्या आहेत.तुळसाबाई ज्ञानोबा व्हावळे, असे या महिलेचे नाव असून त्या मूळच्या परळी येथील माळहिवरा गावात राहतात. त्यांना दोन मुले असून दोघांचीही लग्न झाली आहेत. रंगपंचमीच्या काही दिवसआधी मोठ्या मुलाचे बायकोसोबत भांडण झाल्याने त्यांची सून माहेरी नेरुळ येथे निघून आली. बरेच दिवस होऊनही सून परत न आल्याने तुळसाबाई सुनेची मनधरणी करण्यासाठी नेरुळला आल्या. दिवसभर सुनेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनेने भांडण करून त्यांना हाकलून दिले. ती रात्र रस्त्यावर काढून सकाळी गावी जाण्याच्या तयारीत असतानाच लॉकडाउन घोषित झाला आणि त्या अडकल्या. सुरुवातीला मिळेल त्या मार्गाने गावी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या वेळी एका महिलेने त्यांची समजूत काढून थांबवले. सलग तीनदा लॉकडाउन वाढल्याने सोबत असलेले पैसेही खर्च झाले. त्यामुळे कचराकुंडीतून अन्न गोळा करून भूक भागविण्याची वेळ त्यांच्यावर आली.नेरुळ सेक्टर १० येथे राहणाºया कमल शेरे या महिलेने त्यांना कचराकुंडीतून अन्न जमा करताना पाहिले. त्यांनी तुळसाबाईकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली. मात्र, तरीही त्यांच्या गावाकडची ओढ लागून आहे.>लॉकडाउन लागल्यानंतर काहींनी झोपडपट्टीत अन्न वाटताना त्यांनाही दिले. मात्र, काही दिवसांनंतर ते मिळेनासे झाले. त्यावर पर्याय म्हणून त्यांनी परिसरातली रद्दी जमा करून विकून पैसे मिळ्वण्याचाही प्रयत्न केला; परंतु जमा केलेली रद्दी विकण्याचीही सोय नसल्याने त्याच ठिकाणी उघड्यावर त्या दिवस घालवत आहेत.लॉकडाउनमुळे अनेकांवर अनपेक्षितपणे घरापासून दूर राहण्याची वेळ आली आहे; परंतु या संकटातही तुळसाबाई यांनी हार मानली नाही. झोपडपट्टीच्या बाजूलाच मोकळ्या जागेतच त्या रात्रीचा आसरा घेत आहेत. तर दिवसभर परिसरात फिरून कोणाकडून कसलेही मजुरी काम मिळतेय का, याची चौकशी करत फिरत आहेत.