शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेला ‘आरटीआय’चे वावडे; माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 06:57 IST

नवी मुंबई महापालिकेविरोधात राज्य माहिती आयुक्तांच्या कोकण खंडपीठाकडे तक्रार

नवी मुंबई : महापालिकेने माहिती अधिकार कायदा धाब्यावर बसविला असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते सुधीर दाणी  यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या कोकण खंडपीठाकडे केली आहे. 

द्वितीय अपीलाच्या सुनावणीत अर्जदाराने मागितलेली संपूर्ण माहिती १५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश जनमाहिती अधिकाऱ्यांनी २७ मे रोजी महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, एक महिना उलटून गेला तरी ती देण्यास संबंधित विभागाने चालढकल केली असल्याची त्यांची तक्रार आहे. करदात्या नागरिकांसमोर समोर महापालिकेचा कारभार खुला आणि पारदर्शक असला पाहिजे. त्यामुळे  याप्रकरणी कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी दाणी यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे केली आहे. 

एकाही अर्जाची दखल घेतलेली नाही

सजग नागरिक मंचाने मागील काही महिन्यांत विविध सामाजिक तथा नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक माहिती अधिकार अर्ज महापालिकेकडे दाखल केले आहेत. परंतु, यापैकी एकाही अर्जावर कार्यवाही झालेली नाही. यामुळे या काळात आरटीआयचे किती अर्ज दाखल झाले आणि त्यापैकी किती अर्जांना महापालिकेने उत्तर दिले, किती अर्जांवर सुनावणी घेऊन आदेश पारित केले, याचा लेखाजोखा मागवावा, अशी विनंतीही त्यांनी कोकण खंडपीठाकडे केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताCourtन्यायालय