शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ येथील आंतराराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रायगडच्या स्पर्धकांचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:41 IST

देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये या सातही स्पर्धकांनी आपला ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

मधुकर ठाकूर 

उरण :  

नेपाळमध्ये तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशन"च्या सातव्या आंतरराष्ट्रीय खेळ  स्पर्धामध्ये जलतरण विभागाच्या विविध वयोगटात सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील सात स्पर्धकांनी १३ सुवर्ण आणि १ रजत पदकांची कमाई केली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये या सातही स्पर्धकांनी आपला ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.संयुक्त भारत खेल फाउंडेशनच्या वतीने १७ ते १९ सप्टेंबर २०२२ रोजी इंदौर-मध्यप्रदेश येथे घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय जलतरण विभागाच्या विविध स्पर्धांमध्ये या रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली होती.तर उरणच्या आर्यन विरेश मोडखरकर,हितेश भोईर, जयदीप सिंग या तीन खेळाडूंनी विविध वयोगटातील विविध प्रकारच्या जलतरण स्पर्धांमध्ये ९ सुवर्ण पदकांची कमाई केली होती. या स्पर्धेतील चमकदार कामगिरीची दखल घेऊन नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धाँसाठी उरणच्या या तीनही जलतरणपटुंसह रायगड जिल्ह्यातील आणखी चार अशा सात स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. नेपाळ येथे १७ ते १९ नोव्हेंबर २०२२  रोजी झालेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशच्या"सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाँमध्ये जलतरण विभागातील स्पर्धेमध्ये सहभागी होत आर्यन विरेश मोडखरकर याने १७ वयोगटामधील ५० मीटर बटरफ्लाय आणि १०० मीटर फ्रिस्टाईल या प्रकारातील स्पर्धामध्ये सहभागी होत दोनही स्पर्धाँमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर हितेश भोईर याने ३० वर्ष वयोगटातील ५० मी. फ्रिस्टाईल आणि २००  मीटर आयएम या प्रकारामध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. जयदीप सिंग यानेही ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामध्ये सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. तर सचिन उल्हास शिंगरुत,संकेत म्हात्रे,सनी टाक यांनीही प्रत्येकी दोन-दोन सुवर्ण, समर्थ नाईक यांनी एक सुवर्ण एक रजत,  देशासाठी १३ सुवर्ण आणि १ रजत पदकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धाँमध्ये सहभागी होत रायगड जिल्ह्यातील या सातही खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे.

याआधी संयुक्त भारत खेल फाउंडेशनच्या वतीने इंदौर, मध्यप्रदेश येथे १७ ते १९ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही उरणच्या आर्यन विरेश मोडखरकर, हितेश भोईर आणि जयदीप सिंग या तीन स्पर्धकांनी प्रत्येकी तीन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. तर या तिघांनी यावेळी एकूण सहा सुवर्ण पदके पटकावली आहेत.