शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील धोकादायक शेडमुळे प्रवाशांना मनस्ताप; वळसा घालून जायची वेळ

By योगेश पिंगळे | Updated: December 15, 2023 19:46 IST

रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेरच ही शेड असल्याने शेड खालून प्रवाशांची ये-जा सुरू असते.

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: वाशी रेल्वेस्थानकाबाहेर रेल्वे पोलिसांची वाहने, ॲम्ब्युलन्ससाठी शेड उभारले आहे. ही शेड धोकादायक झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून तिचा वापर बंद केला असून प्रवाशांनी या भागात जाऊ नये, यासाठी शेडकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांना वळसा मारून रेल्वेस्थानक गाठावे लागत असल्याने प्रवाशांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.

रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेरच ही शेड असल्याने शेड खालून प्रवाशांची ये-जा सुरू असते. तिची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने यापूर्वी पावसाळ्यात तिचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली होती. मागील काही महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असल्याने तिचा वापर बंद केला आहे. याबाबतचे फलक परिसरात बसविले असून तिच्या खालून प्रवाशांनी ये-जा करू नये यासाठी रस्ता बंद केला आहे. यामुळे रघुलीला मॉलच्या बाजूने रेल्वेस्थानक गाठणाऱ्या आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. मागील काही महिन्यांपासून धोकादायक अवस्थेत असलेल्या शेडच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने विलंब झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई