शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेवर समाजाचा पूर्ण विश्वास आहे - अ‍ॅड. उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:50 IST

समाजाचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कोणत्याही जातीधर्माचा न्यायालयाच्या निकालावर कधीच परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई : समाजाचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कोणत्याही जातीधर्माचा न्यायालयाच्या निकालावर कधीच परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. वाशीतील श्री सोमेश्वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सव सोहळ्यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत अ‍ॅड. निकम यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.कामातील सत्यता, संयम व आत्मविश्वास यामुळेच कसाबसारख्या दहशतवाद्याला शिक्षा मिळाल्याचेही निकम यांनी स्पष्ट केले. नेहमी सत्याच्या बाजूने लढत आलो असून, यापुढेही सत्याच्या बाजूनेच लढणार, असा ठाम विश्वास अ‍ॅड. निकम यांनी वाशीत व्यक्त केला. या मुलाखतीतंर्गत त्यांचा गाजलेल्या खटल्यांचा व वैयक्तिक जीवनप्रवास उलगडण्यात आला. कुलभूषण जाधव मायदेशी परतणार का, असा प्रश्न विचारला असता पाकिस्तानची राजनीती मोठी धोकादायक असल्याचे वक्तव्य करत पाकिस्तान सरकार दुटप्पी नीती वापरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्य नेटाने मांडले म्हणूनच कसाबच्या खटल्यात पाकिस्तान कशाप्रकारे दोषी आहे, हेही जगासमोर मांडता आले, असे ते म्हणाले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात देशाच्या विरोधात वाईट कृत्य करणाºयांना शिक्षा मिळाली. हे स्फोट दाऊद आणि त्याच्या इतर साथीदारांनी घडवून आणल्याचे तपासात समोर आले होते. या खटल्यासाठीच आपण सरकारी वकील म्हणून प्रथम मुंबईत आलो आणि हा खटला चालवला. या प्रकरणात सिनेअभिनेत्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. माणूस कितीही मोठा असो, तो नेता, अभिनेता असो कायद्यासमोर सगळेच सारखे आहेत. हा आपली न्यायव्यवस्था सक्षम असल्याचा पुरावा असल्याचे निकम यांनी सांगितले.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम