शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे आरक्षण करणारे दलाल अटकेत, अतिरिक्त रकमेची होत होती आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:51 IST

रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करणा-या दोघा दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघेही सिडकोचे सुरक्षारक्षक असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली आहे.

नवी मुंबई : रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करणा-या दोघा दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघेही सिडकोचे सुरक्षारक्षक असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली आहे. तिकिटाच्या रकमेपेक्षा ४०० ते ५०० रुपये जादा घेऊन ते प्रवाशांना आरक्षण करून द्यायचे.कोपरखैरणे रेल्वेस्थानकात नेमलेल्या सिडकोचे इलेक्ट्रिशन कामगार रेल्वे तिकिटांच्या आरक्षणात दलाली करत होते. याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक लोकेश सागर यांना मिळाली होती. यानुसार आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक डी. के. शर्मा, हवालदार किसन सिंह, महेश गुर्जर, नीलेश दळवी यांच्या पथकाने बुधवारी दुपारी कोपरखैरणे स्थानकात तिकीटखिडकी परिसरात सापळा रचला होता. या वेळी अमीर लाल भगत उर्फ दुर्गा व सुरेश पवार यांना रेल्वेतिकिटांची दलाली करताना रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीत दोघेही सिडकोच्या विद्युत विभागातील कर्मचारी असल्याचे समोर आले. भगत हा कोपरखैरणे स्थानकात, तर पवार हा सीवूड स्थानकात नेमलेला आहे. यापूर्वी दोघेही कोपरखैरणे स्थानकात एकत्र कार्यरत होते. यादरम्यान त्यांचे कार्यालय व रेल्वेतिकिटांची आरक्षण खिडकी शेजारीच असल्याची संधी साधून त्यांनी दलाली सुरूकेली होती. याकरिता उत्तरप्रदेशमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना गाठून त्यांचे आरक्षण करून देतो, असे सांगायचे. याकरिता त्यांच्याकडून ४०० ते ५०० रुपये जादा रक्कम घ्यायचे. व्यवहार निश्चित झाल्यानंतर इतर प्रवाशांनी लावलेली रांग तोडून ते थेट खिडकीजवळ जाऊन तिकीट काढून त्यांना द्यायचे. मात्र, त्यांच्याकडून सुरू असलेल्या या प्रकाराचा त्रास इतर प्रवाशांना व्हायचा. यामुळे तक्रार प्राप्त होताच कोपरखैरणे स्थानकात सापळा रचून दोघांनाही अटक केल्याचे आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक लोकेश सागर यांनी सांगितले.