शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

आयुक्तांनी वाचविले १८२ कोटी

By admin | Updated: July 15, 2016 01:41 IST

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनावश्यक खर्चावर निर्बंध आणले आहेत. मोरबे धरणावर उभारण्यात येणारा वादग्रस्त सौरऊर्जा प्रकल्प रद्द केला असून

नवी मुंबई : पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनावश्यक खर्चावर निर्बंध आणले आहेत. मोरबे धरणावर उभारण्यात येणारा वादग्रस्त सौरऊर्जा प्रकल्प रद्द केला असून पालिकेचे १६३ कोटी रूपये वाचले होते. आंबेडकर भवनच्या मूळ रचनेत बदल करून आयत्यावेळी तांत्रिकदृष्ट्या अयोग्य मार्बल आच्छादन करण्याचा निर्णय घेतला होता. १९ कोटी ३२ लाख रूपये खर्चाचा हा प्रस्तावही रद्द करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हा नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रकल्पाचे काम रखडल्याने शहरवासीयांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच आंबेडकर भवनचे काम वेगाने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्मारकाच्या मूळ कामामध्ये डोमला मार्बल आच्छादन लावण्याचे प्रस्तावित नव्हते. परंतु काही महिन्यांपूर्वी अचानक तातडीने घाईगडबडीत मार्बल लावण्याचा १९ कोटी ३२ लाख रूपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सभागृहानेही स्मारकासाठी त्यास परवानगी दिली होती. परंतु भवनचे वैशिष्ट्य असणाऱ्या डोमला मार्बल तांत्रिकदृष्ट्या योग्य असणार का याविषयी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले नव्हते. आयुक्तांनी याविषयी आयआयटीकडून अहवाल मागितला असता तांत्रिकदृष्ट्या मार्बल बसविणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले. सागरी वाऱ्यामुळे व वाहतूक प्रदूषणामुळे मार्बल आच्छादनामध्ये फरक पडण्याची भीती व्यक्त केली. यामुळे मार्बलऐवजी पांढरा शुभ्र रंग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भवनचे सौंदर्य वाढणार असून पालिकेचे १९ कोटी ३२ लाख रूपये वाचणार आहेत. महापालिकेने मोरबे धरणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. अत्यंत घाईगडबडीत २०० कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जाणार होता. परंतु ठेकेदारानेच माघार घेतल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. यानंतर पुन्हा १६३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला. सप्टेंबर २०१४ ते मे २०१५ या कालावधीमध्ये हा प्रकल्प उभारणे आवश्यक होते. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज खरेदी करण्याचा करार महावितरणबरोबर होणे आवश्यक होते. परंतु महावितरणने वीज खरेदी करून शकत नसल्याचे स्पष्ट कळविले आहे. यामुळे हा प्रकल्प रखडला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकल्पाची माहिती घेतली असता त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. पालिकेचे नुकसान होणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालिकेचे १६३ कोटी रूपये वाचणार आहेत. आयआयटीने मार्बलविषयी दिला अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक नवी मुंबईमध्ये उभे राहात आहे. आयुक्तांनी स्वत: स्मारकाच्या कामाकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. डोमला मार्बल लावणे तांत्रिकदृष्ट्या योग्य होईल का याविषयी आयआयटीकडून अहवाल मागविला होेता. आयआयटीने पूर्ण प्रस्ताव अभ्यास करून मार्बल लावणे योग्य नसल्याचा अहवाल दिला आहे. स्मारक खाडीकिनारी आहे. सागरी वारे व हवा प्रदूषणामुळे मार्बलच्या रंगात फरक पडण्याची शक्यता आहे. मार्बल काळवंडल्याने डोमचे आकर्षण निघून जावू शकते. स्मारकाचे बांधकाम गोलाकार, निमुळते व तिरक्या आकाराचे आहे. यामुळे मार्बल बसविताना केलेले जोडकाम भविष्यात उष्णतेमुळे कमी - जास्त होण्याची शक्यता आहे. शिवाय त्यामुळे गळती होण्याचीही शक्यता आहे. यामुळे मार्बलऐवजी पांढरा शुभ्र रंग दिला जाणार असून त्यामुळे सौंदर्यात भरच पडणार आहे. आयुक्तांनी विजेच्या धक्क्यातून वाचविलेवादग्रस्त सौरऊर्जा प्रकल्प रद्द केल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांकडून व शहरवासीयांनीही आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पालिकेच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी सौरऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही शहरातील सामाजिककार्यकर्त्यांनी शासनाकडे धाव घेतली होती. सौरउर्जा प्रकल्प व्यवहार्य नाही. पालिकेचे १६३ कोटी रूपये पाण्यात जाणार असून तिजोरीला शॉक लागणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आयुक्तांनी प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेवून विजेच्या धक्क्यातून पालिकेला व शहरवासीयांना वाचविले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जनतेच्या पैशाचा काटेकोर वापर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, स्मारकाच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. स्मारकाची रचना, वातावरण पाहता मार्बल योग्य होणार नसल्याचा आयआयटीचा अहवाल असल्याने ते वापरणे तांत्रिकदृष्ट्या योग्य होणार नाही यामुळे हा निर्णय घेतला आहे. मोरबे धरणावरील सौरऊर्जेचा प्रकल्प व्यवहार्य नव्हता. त्यामुळे पालिकेचे १६३ कोटी रूपये फुकट जाणार होते. जनतेच्या पैशाचा काटेकोरपणे व लोकहिताच्या कामांसाठीच वापर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.