शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मार्केट वापरात आणण्यासाठी आयुक्तांनी केली पाहणी

By योगेश पिंगळे | Updated: June 21, 2024 18:03 IST

सूचनांची अंमलबजावणी करून मार्केट तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महानगरपालिकेच्या बांधून तयार झालेल्या वास्तू विहित प्रयोजनासाठी वापरात याव्यात असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील मार्केटच्या इमारती वापरात येण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मार्केट इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करुन त्या वापरात येण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. सूचना केलेल्या बाबींची तातडीने अंमलबजावणी करुन ही मार्केट तत्परतेने सुरु करावीत असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

दिवाळेगाव येथील मार्केटची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील अंतर्गत व परिसर स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या. त्या ठिकाणी सदयस्थितीत पोर्टेबल स्वरुपाची शौचालये ठेवलेली असून तेथे कायमस्वरुपी शौचालय बांधावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. सानपाडा सेक्टर ४ येथील दैनंदिन बाजार इमारतीची पाहणी करताना विक्रेत्यांना व ग्राहकांना सोयीचे व्हावे यादृष्टीने तेथील ओटल्यांची रचना काहीशी बदलून ती टेबल स्वरुपाची करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. हे काम तत्परतेने करुन मार्केट त्वरित वापरात आणण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सानपाडा सेक्टर १४ येथील मार्केटमध्येही बाहेरच्या बाजूस वेदरशेड करण्याच्या सूचना करुन त्याठिकाणी असलेल्या दुसऱ्या प्रवेशव्दारावरुन नागरिकांना सुलभतेने ये-जा करण्यासाठी तेथे पायऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. वाशी सेक्टर १ येथील मार्केटमधील ओटल्यांची रचना बदलण्याचे सूचित करुन आयुक्तांनी त्याठिकाणचेही छत बाहेरच्या बाजूस वाढवून वेदरशेड टाकण्याच्या सूचना केली. वाशी सेक्टर ९ येथील एनएमएमटी बस टर्मिनस व वाणिज्य संकुल बांधकामाचीही पाहणी करत विविध सूचना केल्या. या दौऱ्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी नवी मुंबई क्षेत्रातील पावसाळी स्थितीचीही पाहणी केली. यावेळी शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच उपआयुक्त सोमनाथ पोटरे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई