शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोपट्यातील ८१ वर्षाची परंपरा जपणारा शिव-गौरा उत्सवाला प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 19:43 IST

मागील ८१ वर्षांची सलग पाच दिवस उत्सव साजरा करण्याची परंपरा जपणाऱ्या शिवकृपा मंडळाच्या शिवगौराई उत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : मागील ८१ वर्षांची सलग पाच दिवस उत्सव साजरा करण्याची परंपरा जपणाऱ्या शिवकृपा मंडळाच्या शिवगौराई उत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. उरण तालुक्यातील खोपटा येथील शिवगौराई उत्सवाच्या पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, भजन,किर्तन, गोंधळ, महिला पुरूषांचे पारंपारिक नृत्य, मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथील रामजी पाटील,रघुनाथ पाटील, विश्वनाथ पाटील, जनार्दन  पाटील, रामभाऊ भगत, दादु  पाटील, जगन्नाथ  पाटील आदी गावकऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने  १९४१ साली शिवकृपा गौरा मंडळाची  स्थापना केली. पूर्वी एका जुन्या घरात या शिवगौऱ्याची स्थापना केली जात होती. कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले. त्यानंतर त्याच ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून या मंदिरात शिवगौऱ्याची प्रतिष्ठापना केली जात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली.

गौरी आवाहनाच्या दिवशी सूरू होणाऱ्या या गौरा उत्सवात शंकर,पार्वती आणि गणेशाची एकत्रीत मुर्ती बसविण्यात येते. पहिल्या दिवशी महिलांना येथे प्रवेश दिला जात नाही. यावेळी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक कथा प्रसंगावर सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जातात. विशेष म्हणजे दरवर्षी बसविण्यात येणाऱ्या या मुर्ती शाडू मातीच्याच बनविण्यात येतात. पाच दिवस चालणाऱ्या या गौरा उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन,किर्तन, गोंधळ, महिला-पुरूषांचे पारंपारिक नाचांचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

या मंडळाचे आणि गौरा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ८१ वर्षापासून येथे पायाला घुंगरू बांधून पारंपारिक बाले नाच, शक्ती तुऱ्याचे नाचाची जूगलबंदीचे सामन्यांशिवाय या उत्सवाची सांगता होत नाही. नवसाला पावणारा अशी या शिवगौऱ्याची ख्याती आहे.मागील ८१ वर्षापासून हा सण अखंडपणे साजरा करण्यात येतो. भाद्रपद शुद्ध द्वादशीला ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून सुर्यास्तापूर्वी या शिवगौऱ्याचे विसर्जन केले जाते.या शिवगौराच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण अलिबाग परिसरातील हजारो भाविक येतात.

टॅग्स :ganpatiगणपती