शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येत्या निवडणुकीत महाराष्ट्रावर भगवा फडकणार - देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:20 IST

शिवसेनेचा दणका अजूनही संपलेला नाही. मागून मिळणार नाही ते हिसकासून घेण्याची ताकद आपल्यात आहे. मध्यंतरी या भागातील एका कारखानदाराला

कर्जत : शिवसेनेचा दणका अजूनही संपलेला नाही. मागून मिळणार नाही ते हिसकासून घेण्याची ताकद आपल्यात आहे. मध्यंतरी या भागातील एका कारखानदाराला धडा शिकवला. आमचा हक्क डावलाल तर याद राखा. भूमिपुत्रांना न्याय देणार नाहीत त्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांच्या विकासासाठी या वेळी या मतदारसंघाचा आमदार शिवसेनेचा असला पाहिजे, अशी खूणगाठ मनाशी बांधा. येत्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रावर भगवा फडकणार हे निश्चित, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.शेळके बंधू सभागृहामध्ये कर्जत तालुका शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून निर्धार मेळाव्याचे उद्घाटन केले. संभाजी जगताप आणि महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. खासदार श्रीरंग बारणे, महिला संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर, संपर्कप्रमुख संजय मोरे, सल्लागार बबन पाटील, हनुमंत पिंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, विजय पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांनी प्रास्ताविकात, गेल्या दहा वर्षांत वाडी-वस्तीवर रस्ते केले नाहीत. परिसराच्या विकासासाठी आपापसातील मतभेद विसरून कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.किशोरी पेडणेकर यांनी, निवडणुकीच्या आधी आपल्यातील काही मासे इतर पक्षांच्या गळाला लागतात. मात्र, त्याची आधी चाहूल लागताच थेट संपर्क करण्याच्या सूचना पेडणेकर यांनी दिल्या.खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनोगतात, आगामी लोकसभा व विधानसभा स्वबळावर लढविण्याचा निर्धार पक्षप्रमुखांनी दिला आहे. त्यासाठी आपण मागचे सारे विसरून कामाला लागा, असा सल्ला दिला. कर्जत अणि शिवसेनेचे नाते घट्ट आहे. शिवसेनाप्रमुखांचे या भूमीमध्ये वास्तव्य होते. ज्या उमेदवाराला निवडणुकीचे तिकीट मिळेल त्याला निवडून आणण्याचा चंग बांधा. निवडणुकीआधी आपण एकत्र असतो आणि ऐन निवडणुकीत भांडतो या उलट काँग्रेस-राष्ट्रवादीवाले साडेचार वर्षे भांडतात आणि निवडणुकीत एकत्र येऊन निवडणूक जिंकतात. बंडखोरीचे ग्रहण काढून टाका, असा सल्ला शिंदे यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक सुर्वे यांनी केले.