शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक जमा करण्यासाठी संकलन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:35 IST

राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली; मात्र घर, दुकान आदी ठिकाणी असलेले प्लॅस्टिक कुठे टाकावे, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

मुंबई : राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली; मात्र घर, दुकान आदी ठिकाणी असलेले प्लॅस्टिक कुठे टाकावे, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बॅग, सजावटीचे प्लॅस्टिक साहित्य, थर्माकोल आदी सामान नागरिकांना जमा करता यावे, यासाठी महापालिका २० ठिकाणी संकलन केंद्रे स्थापन करणार आहे. बाजार आणि रेल्वे स्थानक अशा वर्दळीच्या ठिकाणी ही केंद्रे सुुरू करण्यात येणार आहेत.राज्य सरकारने प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, साठा करणं यावर बंदी आणली आहे. त्यानुसार घरात असलेले प्लॅस्टिक फेकण्यास व त्याचा वापर थांबविण्यास ग्राहकांना १५ दिवस ते एक महिना तर उत्पादकांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत ग्राहक आणि उत्पादकांनी आपल्याकडील प्लॅस्टिक संकलन केंद्रामध्ये जमा करावे. या केंद्रात एकत्रित केलेल्या प्लॅस्टिकवर पुन:प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार या संकलन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे.प्रत्येक वॉर्डात प्लॅस्टिकवर पुन:प्रक्रिया करणाऱ्या संस्थांची यादी तयार करण्यात येत आहे. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येणार आहे. तूर्तास एक महिनाभर महापालिका केवळ प्लॅस्टिक बंदीबाबत जागृती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच या मोहिमेत सिनेतारका अथवानामवंत व्यक्तींची मदत घेऊन नागरिकांना ‘प्लॅस्टिकमुक्त मुंबई’चा संदेश देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.