शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर कोसळले झाड

By admin | Updated: June 25, 2016 02:00 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास दासगाव गावच्या हद्दीत अनेक महिने जळालेल्या अवस्थेत उभे असलेले झाड अचानक कोसळले

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास दासगाव गावच्या हद्दीत अनेक महिने जळालेल्या अवस्थेत उभे असलेले झाड अचानक कोसळले. मात्र झाडापासून काही नुकसान झाले नाही. परंतु रात्रीच्या वेळेत वेगात असलेल्या चार गाड्या एका मागून एक आदळल्या. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी मात्र चार वाहनांचे नुकसान झाले. अपघातानंतर महामार्ग जवळपास दोन तास ठप्प झाला होता.काही दिवसांपूर्वी धोकादायक झाडासंदर्भात ‘लोकमत’ने बातमी प्रसिध्द के लीहोती. जे झाड कोसळले त्या झाडाचे वर्णनही यामध्ये होते. मात्र महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आजही अनेक झाडे धोकादायक स्थितीत आहेत. तरी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वाहन चालक तसेच प्रवाशांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री दासगांव गावचे हद्दीत अनेक दिवसांपासून सुकलेल्या झाडाकडे महामार्ग अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. ते आंब्याचे झाड अचानक कोसळले. यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या चार गाड्या एकमेकांवर आदळल्या.एसटी बस क्र. एमएच १४ बीटी २५५३ यावर इर्टीगा एमएच ०२ डीएन ६६४२ मागून आदळली. पुन्हा एमएच २० बीएल २४४१ परेल -भातगांव एसटी त्यामागून खासगी बस क्र. एमएच ०४ जीपी १४४० अशा चार गाड्या आदळल्या. या अपघातामध्ये जीवितहानी वा कोणीही जखमी झाले नसले तरी चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (वार्ताहर)महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक झाडे आहेत. गुरु वारी कोसळलेल्या झाडाबाबत ‘लोकमत’च्या ३० मेच्या हॅलो रायगडमध्ये कोसळणाऱ्या झाडाचाच फोटो लावत धोकादायक झाडांची बातमी प्रसिद्ध केलीहोती. आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे वाहन चालक व प्रवाशांकडून महामार्ग अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून के ली जातआहे . हि धोकादायक झाडे कढावी अशी मागणी होत आहे.