शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा दुजोरा;महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 15:09 IST

या विमानतळाच्या नामकरणावरून बराच वाद रंगला आहे.

वैभव गायकर, पनवेल: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त करीत आहेत. याबाबत अनेक वेळा मोर्चे काढण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर सेना व प्रकल्पग्रस्त असा संघर्ष निर्माण झालेला असल्याचे पाहायला देखील मिळाले आहे. या मागणीबाबत स्थानिक पनवेल उरण महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज (२८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे या भूमिकेवर शिवसेना ठाम होती. मात्र आज शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिबा यांच्या नावाला होकार दिल्याचा दावा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.

या शिष्टमंडळात शेकापचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, काँग्रेसचे अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, सपाचे अनिल नाईक यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. विमानतळाच्या नामकरणाचा विषय बैठकीत पुढे आल्यावर सिडकोने केलेला ठराव हा तात्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून केला होता. शासकीय स्तरावर असा कोणताही निर्णय झाला नसून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लवकर दि. बा. पाटील यांच्या नावाने हा ठराव घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचा दावा पनवेल काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ठराव करताना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले नसल्याचे मख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाल्याचा प्रकार यात दिसून येतो अशी चर्चा आता रंगली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला होकार दिल्याच्या दाव्याच्या वृत्तानंतर प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांनी जो लढा उभारला त्याला एका अर्थी यश आल्याची भावना दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.